२५ सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

प्रलंबित प्रकरणांचा होणार निपटारा
२५ सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

अहमदनगर | प्रतिनिधी

जिल्ह्यातील (Ahmednagar) सर्वच न्यायालयांमध्ये (Court) 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे (National Lok Adalat) आयोजन करण्यात आले आहे. करोना नियमावलीचे (Corona Rules) पालन करून अधिकाधिक पक्षकारांनी सहभागी होऊन न्यायालयात दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढावीत असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा यांनी केले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (National Legal Services Authority) व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण (Maharashtra Legal Services Authority) यांच्या सुचनेनुसार आयोजित या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये (National Lok Adalat) दाखल पूर्व व प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. सदरचे लोकअदालत आभासी पद्धतीद्वारे देखील आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार बरीच प्रकरणे अभासी पद्धतीने हाताळण्यात येतील.

जिल्हा न्यायालयासह (District Court) जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावरील न्यायालयामध्ये घेण्यात येत असलेल्या या लोकअदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी, एन. आय. अ‍ॅक्टची प्रकरणे, बँक कर्ज वसूली प्रकरणे, मोटार वाहन नुकसान भरपाई, कामगार कायद्याखालील प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, इलेक्ट्रीसिटी अ‍ॅक्टची समझोता प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरचे दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. ज्या नागरिकांना आपली प्रकरणे सदर लोकअदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधीत न्यायालयात किंवा नगर न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कार्यालय किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com