अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 10 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले

आहे. पक्षकार व नागरीकांनी सामंजस्याने प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. श्रीकांत आणेकर यांनी केले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सुचनेनुसार आयोजित या राष्ट्रीय लोकदालती मध्ये दाखलपुर्व व प्रलंबीत प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. नगर जिल्हा मुख्य न्यायालयासह जिल्हयातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयांमध्ये घेण्यात येत असलेल्या या लोक अदालतीमध्ये न्यायालयातील दिवाणी, फौजदारी, एन.आय अॅक्ट ची प्रकरणे,

बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायद्याखालील प्रकरणे, कौटुंबीक वादांची प्रकरणे, इलेक्ट्रीसीटी अॅक्टची समजोता योग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरचे दाखलपुर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. पक्षकारांनी आपसी समझोत्याकरिता ठेवून ती सामंजस्याने सोडवण्याबाबतचे अवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा न्या. श्रीकांत आणेकर तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. रेवती देशपांडे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संबंधित न्यायालयात किंवा नगर न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय येथे स्वतः येऊन कळवावे, असे आव्हान आयोजकांनी केले.