
भेंडा |वार्ताहर| Bhenda
भेंडा (Bhenda) येथे झालेल्या निवड चाचणी शिबिरातून 69 व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप 2022 साठी (National Kabaddi Championship 2022) महाराष्ट्राचा पुरुष कबड्डी संघाची निवड करण्यात आली असून भेंड्याचे (Bhenda) संघात शंकर गदाई व राहुल खाटीक या दोन खेळाडूंचा समावेश झाला आहे.
नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) भेंडा (Bhenda) येथील श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता शास्र व कला महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन मुंबई यांच्या सहकार्याने अहमदनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित 69 वे महाराष्ट्र राज्य पुरुष गट संघ निवड शिबिर पार पडले.
त्यात अहमदनगर जिल्हा (5), मुंबई शहर (4) ,मुंबई उपनगर (3) ,ठाणे जिल्हा (3) ,रायगड जिल्हा (1) ,रत्नागिरी जिल्हा (2), पुणे जिल्हा (2) ,अहमदनगर जिल्हा (5), सांगली जिल्हा (1), नाशिक जिल्हा (1) ,धुळे जिल्हा (2), बीड जिल्हा (1), जालना (1), नांदेड जिल्हा (2), नंदुरबार जिल्हा (1) असे एकूण 28 खेळाडू या शिबिरामध्ये सहभागी झाले होते.
या शिबिरातून निवडलेला हा बारा खेळाडूंचा संघ दि. 21 जुलै ते 25 जुलै या कालावधीत चरकी दादरी हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
दिनांक 7 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सचिव आस्वाद पाटील खजिनदार मंगल पांडे तसेच महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे प्रशासकीय अधिकारी सचिन भोसले यांनी शिबिराला भेट देऊन खेळाडूंना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे, श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,विश्वस्त माजी आमदार पांडुरंग अभंग,डॉ.क्षितिज घुले पाटील,सचिव अनिल शेवाळे, सहसचिव रवींद्र मोटे,प्राचार्य डॉ.रामकीसन सासवडे,शारीरिक शिक्षण संचालक प्रा.दत्ता वाकचौरे,
अहमदनगर कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष जयंत वाघ, खजिनदार प्रकाश बोरुडे, सहसेक्रेटरी विजय मिस्कीन, अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाचे कबड्डीचे मार्गदर्शक श्री.खुरंगे,शंतनू पांडव आदींनी निवड झालेल्या संघाचे अभिनंदन केले.
दि.7 जुलै 2022 रोजी निवड समिती राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड समितीचे सदस्य संजय मोकल, संजय सूर्यवंशी, आमदार योगेश पाटील या समितीने निवड केलेल्या महाराष्ट्र संघात खालील खेळाडूंचा समावेश आहे.
शंकर गदाई (अहमदनगर), मयूर कदम (रायगड),असलम इनामदार (ठाणे ), आकाश शिंदे (नाशिक), राहुल खाटीक (अहमदनगर), अरकम शेख (मुंबई उपनगर), शेखर तटकरे (रत्नागिरी), सिद्धेश पिंगळे (मुंबई शहर), अक्षय उगाडे (मुंबई शहर), किरण मगर (नांदेड), देवेंद्र कदम (धुळे ), अक्षय भोईर (ठाणे).