राष्ट्रीय आयकॉनिक विकसाठी राहाता पंचायत समिती व लोणी बुद्रुक ग्रामपंचायतची निवड

राष्ट्रीय आयकॉनिक विकसाठी राहाता पंचायत समिती व लोणी बुद्रुक ग्रामपंचायतची निवड

लोणी |वार्ताहर| Loni

आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत आयकॉनिक विकचे आयोजन केले असून त्याकरिता राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ठ काम केलेल्या 75 स्थानिक स्वराज्य संस्थांची निवड यापूर्वीच केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने केली असून त्यामध्ये पंचायत समिती राहाता व लोणी बुद्रृूक ग्रामपंचायत यांचा समावेश आहे.

पंचायत समिती राहाता, लोणी बु. ग्रामपंचायत यांनी 2020-2021 मध्ये तसेच वेळोवेळी राष्ट्रीय पातळीवरील अभियानामध्ये स्वच्छता, जलसंधारण व वृक्ष लागवड ,केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, सुप्रशासन इ .बाबींमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राहाता तालुक्याचे गट विकास अधिकारी श्री.समर्थ शेवाळे , विस्तार अधिकारी श्री. शंकर गायकवाड लोणी बु. च्या सरपंच श्रीमती कल्पनाताई मैड, ग्राम विकास अधिकारी श्री संतोष थिगळे यांच्या कामाची दखल घेत दिल्ली येथे दि. 11 एप्रिल ते 17 एप्रिल या कालावधीत आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत ऑयकॉनिक विकचे आयोजन केले आहे.

त्याकरिता राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ठ काम केलेल्या 75 स्थानिक स्वराज्य संस्थांची निवड यापूर्वीच केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने केली असून त्यामध्ये पंचायत समिती राहाता व लोणी बुद्रूक ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. सदरच्या आयकॉनिक विकचे उदघाटन माजी उपराष्ट्रपती व्यंकय्याजी नायडू यांच्याहस्ते होणार आहे. दि. 11 एप्रिल रोजीच्या उद्घाटन समारंभासाठी राज्यस्तरीय प्रतिनिधी म्हणून वरील अधिकारी, पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. राज्याचे माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पा., शालिनीताई विखे पा., युवा खा. डॉ. सुजय विखे पा. यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती राहाता व लोणी बुद्रुक ग्रामपंचायत केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे.

Related Stories

No stories found.