राष्ट्रीय महामार्गाच्या वंचित प्रकल्पबाधितांना मिळणार मोबदला

आ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला यश
राष्ट्रीय महामार्गाच्या वंचित प्रकल्पबाधितांना मिळणार मोबदला

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग (एन.एच. 160) (National Highway (NH 160) मुळे शासकीय जागेवर वास्तव्यास असलेले अनेक बाधित नागरिक मोबदल्यापासून वंचित होते. त्याबाबत आ.आशुतोष काळे(MLA Ashutosh Kale) यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale), प्रातांधिकारी गोविंद शिंदे (Pratandhikari Govind Shinde), एन.एच.160 चे प्रोजेक्ट डायरेक्टर साळुंके यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून या नागरिकांच्या होणार्‍या नुकसानीचे लवकरात लवकर मूल्यांकन होऊन या प्रकल्पबाधित नागरिकांना मोबदला मिळणार आहे.

कोपरगाव तालुक्यातून (Kopargav Taluka) राष्ट्रीय महामार्ग 160 (National Highway NH 160) जात असून या महामार्गामुळे प्रकल्पबाधित होणार्‍या शेतकर्‍यांना व तसेच अनेक नागरिकांना त्यांच्या जमिनीचा व होणार्‍या नुकसानीचा योग्य मोबदला देण्यात आला आहे. मात्र जे नागरिक शासकीय जागेवर वास्तव्यास होते. ज्यांचे त्या जागेवर उद्योग व्यवसाय सुरू होते त्या जागा संबंधित नागरिकांच्या नावावर नसल्यामुळे त्यांना शासनाकडून भरपाई मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामध्ये देर्डे कोर्‍हाळे (Derde Korhale) येथील 42 व चांदेकसारे (Chadeksare) येथील 7 नागरिकांचा समावेश होता. त्याबाबत या नागरिकांनी आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांच्याकडे भरपाई मिळावी यासाठी त्यांना साकडे घातले होते. हे नागरिक जरी शासकीय जागेवर राहत असले तरी एन.एच.160 (NH 160) मुळे या नागरिकांचे हक्काचे घर व व्यवसाय हिरावले जाऊन या नागरिकांच्या होणार्‍या नुकसानीचा विचार करून आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी त्याबाबत जिल्हाधिकारी (Collector), प्रांताधिकारी, प्रकल्पाधिकारी यांच्यासोबत अनेक बैठका घेऊन हा प्रश्न लावून धरला होता.

त्याबाबत शासनाने एक पाऊल मागे घेत आ. आशुतोष काळे यांच्यासमवेत नुकतीच बैठक घेऊन शासकीय जागेवर वास्तव्यास असणार्‍या ज्या नागरिकांचे घर, व्यवसाय बाधित झाले आहेत. त्या नागरिकांच्या होणार्‍या नुकसानीचा आढावा घेऊन त्याचे मूल्यांकन करण्यात येईल व त्याप्रमाणात या नागरिकांना भरपाई देण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी गोविद शिंदे यांनी शासनाच्यावतीने आ.आशुतोष काळे यांना सांगितले आहे. या बैठकी दरम्यान आ.आशुतोष काळे यांनी एन.एच.160चे प्रोजेक्ट डायरेक्टर साळुंके यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून वंचित असलेल्या प्रकल्प बाधितांना लवकरात लवकर जास्तीतजास्त नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. यावेळी प्रातांधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, सार्वजनिक बांधकाम अभियंता प्रशांत वाकचौरे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक सचिन रोहमारे, देर्डेचे सरपंच योगीराज देशमुख, सुधाकर होन, कृष्णा शिलेदार, केशव विघे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com