राष्ट्रीय महामार्गासाठी अ‍ॅड. ढाकणे यांचे मंत्री गडकरी यांना साकडे

राष्ट्रीय महामार्गासाठी अ‍ॅड. ढाकणे यांचे मंत्री गडकरी यांना साकडे

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत अ‍ॅड प्रताप ढाकणे यांनी राष्ट्रीय महामार्ग 61 नगर ते बीड जिल्हा हद्दीतील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत ना. गडकरी यांचा लक्ष वेधले तसेच लवकरात लकवर यात सुधारणा करण्याचे साकडे घातले. बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अँड. प्रताप ढाकणे यांनी गडकरी यांची भेट घेऊन या महामार्गावर वाहनधारकांना होणार्‍या त्रासाची समस्या प्रकर्षाने मांडली.

याची दखल गडकरी यांनी घेत संबंधित अधिकार्‍यांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी कारखान्याच्या डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभाचे निमंत्रण दिले. या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचा महाराष्ट्र विधिमंडळातील कामकाजावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन कुमार घोळवे, माजी नगरसेवक डॉ. संजय उदमले उपस्थित होते.

Related Stories

No stories found.