आशुतोष काळेंच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंबकल्याण योजनेच्या धनादेशाचे वितरण

आशुतोष काळेंच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंबकल्याण योजनेच्या धनादेशाचे वितरण

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा, एलमवाडी, चितळी, जळगाव आदी गावातील राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांना साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या हस्ते प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले आहे.

आशुतोष काळे सोमवारी निळवंडे कालव्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांच्या राहाता संपर्क कार्यालयात त्यांच्या हस्ते पात्र लाभार्थींना धनादेश देण्यात आले. यामध्ये पुणतांबा येथील ताराबाई बाळासाहेब आहिरे, दिपाली गौतम गायकवाड, उज्वला नितीन जोगदंड, सोना छबु थोरात, वैशाली राम भालेराव, मंगल संजय इंगळे, सुमन सुरेश थोरात, एलमवाडी येथील बालिकाबाई बाळासाहेब मुसकवाड, अमिना रज्जाक शेख, प्रवीण बाबासाहेब तांबे, चितळी येथील रेखा विजय कुर्‍हाडे, व जळगाव येथील शानुर दिलीप शेख अशा 12 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 याप्रमाणे 2 लाख चाळीस हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.

यावेळी तहसीलदार कुंदन हिरे, गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते, मुरलीधर थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ, जळगावचे सरपंच शिवाजीराव साबदे, नपावाडीचे उपसरपंच राजेंद्र धनवटे, गुलशेर शेख, संजय धनवटे आदींसह लाभार्थी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com