राष्ट्रीय पात्रता परीक्षेत राहुरी विद्यापीठाचे यश

राष्ट्रीय पात्रता परीक्षेत राहुरी विद्यापीठाचे यश
राहुरी कृषी विद्यापीठ

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळातर्फे ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विविध विद्याशाखातील 138 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

विविध राज्यातील कृषी विद्यापीठे तथा कृषी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक व समकक्ष पदाकरीता राष्ट्रीय पात्रता परीक्षा अनिवार्य आहे. राहुरी अंतर्गत येणार्‍या कृषी महाविद्यालयांच्या 123 यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये पदव्युत्तरचे 43 तर आचार्य पदवीचे 80 विद्यार्थ्यांनी नेट परीक्षेत यश संपादन केले आहे. कृषी संशोधन सेवा भरती परीक्षेच्या लेखी परीक्षेत 15 विद्यार्थ्यांपैकी कृषी अभियांत्रिकीचे 04, मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र 01, वनस्पती रोगशास्त्र 02, विस्तार शिक्षण 02, कृषी वनस्पतीशास्त्र 02, बियाणे विज्ञान व तंत्रज्ञान 01, वनस्पती शरीरशास्त्र 01 व कृषी विद्या विषयाचे 02 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांची 138 ही संख्या अंतिम नसून त्यात भर पडू शकते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com