अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दुष्काळग्रस्त मराठवाडा तसेच अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याला लाभदायक ठरणार्या कोकणातून

पाणी वळविण्याच्या योजनांच्या अंमलबजावणीच्या हालचाली सुरू झाल्या असून नदीजोड प्रकल्पाच्या कामासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून नाशिक येथे नदीजोड प्रकल्प समन्वय कक्ष स्थापन करण्यास जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे.

मराठवाड्यासाठी कोकणातून पाणी वळविण्यासाठीच्या योजनांना तत्वतः मान्यता देण्यात आली असून त्यानुसार आंतराज्यीय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व राज्यातंर्गत नार-पार-गिरणा, पार-गोदावारी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड प्रकल्प राज्यातंर्गत प्रकल्प म्हणून राबविण्याबाबत निर्देश देण्यात आले ओहत.

तसेच भविष्यकालीन प्रवाही वळण योजना (अंबाड, चिमणपाडा, कळमुस्ते, अंबोली वेंळुजे, कापवाडी, हिवरा, साम्रद, तोलारखिंड, खिरेश्वर, सादडा घाट व पाथरघाट) व प्रस्तावित नदी जोड प्रकल्प (नार-पार-गिरणा, दमणगंगा गोदावरी (एकदरे), पार-गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-कडवा देवनदी) या प्रकल्पांच्या एकत्रित व एकसूत्रीय अंमलबजावणीसाठी थेट स्वतंत्र मुख्य अभियंता, नदीजोड प्रकल्प हे पद निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचारीधीन आहे.

त्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने तात्पुरती व्यवस्था म्हणून नाशिक येथे नदीजोड प्रकल्प समन्वय कक्ष स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा कक्ष आजपासून कार्यान्वित होणार आहे.

या कक्षासाठी नाशिक मुख्य अभियंता (नदीजोड प्रकल्प समन्वय), अधिक्षक अभियंता, वळण योजना गोदावरी खोरे, नाशिक, अधिक्षक अभियंता, वळण योजना तापी खोरे, नाशिक, कार्यकारी अभियंता, वळण योजना गोदावरी खोरे, नाशिक, कार्यकारी अभियंता, वळण योजना तापी खोरे या अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समन्वय कक्षास कार्यवाहीचा आढावा घेऊन शासनास अहवाल करण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, कोकणातून गोदावरी-गिरणा खोर्यात पाणी वळविणार्या सर्व नदीजोड प्रकल्पांत धरणाच्या दमनगंगा आणि तापी नदी जोड प्रकल्पामुळे समुद्रात जाणारं पाणी अडवून मराठवाडा आणि नगरल नाशिकसह अन्य जिल्ह्यांना या प्रकल्पांचा फायदा होणार आहे.