नाशिक महामार्ग फाटा ते मालदाड रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलनाचा इशारा

नाशिक महामार्ग फाटा ते मालदाड रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलनाचा इशारा

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील नाशिक महामार्ग मालदाड फाटा ते मालदाड मार्गे असलेल्या सोनोशी, नान्नज दुमाला, चिंचोलीगुरव डांबरी रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. या डांबरी रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करावी, अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.

नाशिक महामार्ग मालदाड फाटा ते मालदाड मार्गेच्या डांबरी रस्त्यात खड्डेच खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता शेवटच्या घटका मोजत आहे. नाशिक महामार्ग फाट्या पासून मालदाड - सोनोशी - नान्नज - पारेगाव - चिंचोली गुरव - देवकौठे तळेगाव इत्यादी गावांना जोडणारा एक महत्वाचा रस्ता आहे. सदर रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. या गावातील वाहन चालविणार्‍या नागरिकांना हा रस्ता मोठा धोकादायक ठरत आहे.

बर्‍याच वर्षापूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले. सबंधित विभागाकडे सतत पाठपुरावा करून देखील निधीची कमतरता, स्थगिती अशी कारणे दिली जात आहे. वारंवार मागणी करून देखील रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करावी अशा मागणीचे निवेदन सबंधित अधिकारी व प्रशासनाला ग्रामस्थ लक्ष्मण नवले, भाऊसाहेब नवले, मंगेश नवले, विपुल नवले, बाळासाहेब नवले, सुरेश नवले, अनिल नवले, उपसरपंच गणेश भालेराव, मंगेश नवले, भाऊसाहेब नवले, परसराम गोफणे यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com