नाशिक पदवीधरसाठी 16 उमेदवार रिंगणात

हे आहेत उमेदवार
नाशिक पदवीधरसाठी 16 उमेदवार रिंगणात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सोमवारी शेवटच्या दिवशी 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात उमेवारी अर्ज दाखल करतांना घडलेल्या राजकीय घडमोडीचे पडसाद नाशिक विभागात नव्हे, राज्यासह देशपातळीवर पोहचले आहे. यामुळे यंदाची या मतदारसंघातील ही निवडणूक चांगलीच गाजणार असल्याचे संकेत मिळत आहे.

दरम्यान कालअखेरच्या दिवशी माघार घेणार्‍या उमेदवारांमध्ये अमोल बाळासाहेब खाडे, डॉ.सुधीर सुरेश तांबे, दादासाहेब हिरामण पवार, धनंजय कृष्णा जाधव, राजेंद्र दौलत निकम, धनराज देविदास विसपुते या सहा जणांचा समावेश आहे. तर दुसरीकडे दोन दिवसांपासून सुरु असणारी बिनविरोधच्या चर्चेला सोमवारी दुपारी तिननंतर पूर्ण विराम मिळाला आहे.

आता निवडणूक रिंगणात असणार्‍यांमध्ये सत्यजित सुधीर तांबे,संगमनेर (अपक्ष), रतन कचरु बनसोडे, नाशिक (वंचित बहुजन आघाडी), सुरेश भिमराव पवार, नाशिक (नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी), अनिल शांताराम तेजा (अपक्ष), अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर, धुळे (अपक्ष), अविनाश महादू माळी, नंदूरबार (अपक्ष), इरफान मो इसहाक, मालेगाव नाशिक (अपक्ष), ईश्वर उखा पाटील, धुळे (अपक्ष), बाळासाहेब रामनाथ घोरपडे, नाशिक, (अपक्ष), अ‍ॅड. जुबेर नासिर शेख, धुळे (अपक्ष) अ‍ॅड.सुभाष राजाराम जंगले, श्रीरामपुर, (अपक्ष), नितीन नारायण सरोदे, नाशिक (अपक्ष), पोपट सिताराम बनकर, अहमदनगर, (अपक्ष), शुभांगी भास्कर पाटील, धुळे (अपक्ष), सुभाष निवृत्ती चिंधे, नगर (अपक्ष), संजय एकनाथ माळी,जळगाव (अपक्ष) असे एकूण 16 उमेदवार निवडणुक लढविणार आहेत. नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीचे निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ.निपुण विनायक, भाप्रसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीसंदर्भात काही तक्रार असल्यास डॉ. निपुण विनायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहेत.

दरम्यान शुभांगी पाटील महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

नगर जिल्ह्यात अकोले 8 हजार 309, संगमनेर 29 हजार 624, राहाता 15 हजार 354, कोपरगाव 8 हजार 387, श्रीरामपूर 8 हजार 82, राहुरी 7 हजार 849, नेवासा 6 हजार 921, नगर 10 हजार 288, पाथर्डी 4 हजार 424, शेवगाव 4 हजार 222,पारनेर 3 हजार 616, श्रीगोंदा 4 हजार 309, कर्जत 2 हजार 872, जामखेड 2 हजार 52 असे जिल्ह्यात 1 लाख 16 हजार 319 मतदार आहेत. नाशिक विभागात सर्वाधिक मतदार याच जिल्ह्यात असल्याने या निवडणुकीत जिल्ह्यातील मतदार हे निर्णायक ठरणार आहेत.

नाशिक पदवीधर मतदार संघातील निवडणुकीला वेगळे वळण मिळाले असून 18 किंवा 19 तारखेला आपली भूमिका स्पष्ट करू.

- सत्यजित तांबे

नाशिक पदवीधर मतदार संघातील निवडणुकीतील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्यासाठी भाजपाकडून आम्ही पाठिंबा मागितलेला नाही.

- डॉ. सुधीर तांबे

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com