पदवीधरसाठी अर्ज भरूनही अनेक नावे आलीच नाहीत

अनेकांचा हिरमोड
पदवीधरसाठी अर्ज भरूनही अनेक नावे आलीच नाहीत

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची (Nashik Division Graduate Constituency) निवडणूक (Election) 30 जानेवारी रोजी होणार असून या निवडणुकीसाठीची मतदार यादी (Election Voter List) 30 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये शहरातील अनेक लोकांची नावे मतदार (Voter) अर्ज भरून देऊनही आलेली नाहीत. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे.

पदवीधरसाठी अर्ज भरूनही अनेक नावे आलीच नाहीत
पदवीधरसाठी 9 समन्वय अधिकार्‍यांची नियुक्ती

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक (Graduate Constituency Election) दर सहा वर्षांनी होत असते. यासाठी दरवेळी नवीन नाव नोंदणी करावी लागते. गेल्या सात आठ महिन्यापासून मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. विविध पक्ष आणि इच्छुक उमेदवार (Candidate) यांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी मतदारांचे अर्ज भरून घेतले होते. दोन महिन्यापूर्वी नमुना अर्ज बदलल्यामुळे पूर्वीचे अर्ज बाद झाले. त्यामुळे पुन्हा नव्याने अर्ज भरण्यात आले. याबाबत मतदारांची उदासीनता देखील होती. तरी सुद्धा शहरात जवळपास पाच हजार मतदारांनी नोंदणी केली आहे.

पदवीधरसाठी अर्ज भरूनही अनेक नावे आलीच नाहीत
नगर..थंडाथंडा कूल कूल !

मात्र अजूनही अनेक मतदारांची नावे या मतदार यादीमध्ये (Voter List) आलेली नाही. काही मतदारांनी व्यवस्थितपणे मतदार अर्जाचा नमुना भरून दिलेला असताना देखील त्यांची नावे आलेली नाहीत. गंमत म्हणजे एका कुटुंबातील पाच सहा लोकांची नावे जर दिली असतील तर त्यातील एक दोन नावे वगळली गेली आहेत. उर्वरित नावे मात्र आली आहेत. अनेक मतदारांची नावे अनेकवेळा आलेली आहेत. ही नावे इतक्या वेळा कशी काय आली हे मात्र एक कोडे आहे. कारण एखाद्या मतदाराने चुकून दोनदा जरी अर्ज केला असेल तरी संगणकामधील नोंदीनुसार त्याची दुबार नोंदणी व्हायला नको. परंतु या यादीमध्ये मात्र हा गोंधळ झालेला दिसून येतो.

पदवीधरसाठी अर्ज भरूनही अनेक नावे आलीच नाहीत
भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर निघू नये म्हणून अजित पवारांची वक्तव्ये - खा. डॉ. विखे

विधान परिषदेच्या (Legislative Council) पदवीधर मतदारसंघासाठी सोमवार 30 जानेवारी रोजी मतदान होणार असून यावेळी मतदानाची वेळ मात्र सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंतच आहे. 12 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होईल. विशेष म्हणजे या मतदार संघातील सर्व मतदार हे पदवीधारक असूनही मोठ्या प्रमाणामध्ये मतदार नोंदणीबद्दल त्यांच्यामध्ये उदासीनता दिसून आली. शहरातील अनेक नामवंत पदवीधारक नागरिक, शिक्षक (Teacher), डॉक्टर (Doctor), वकील (Lawyer), इंजिनियर (Engineer) व इतर क्षेत्रातील प्रतिष्ठित लोकांची नावे या मतदार यादीमध्ये दिसून येत नाही. येत्या चार-पाच दिवसांमध्ये जे फॉर्म भरून देतील त्यांची नावे बहुदा पुरवणी यादीमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पदवीधरसाठी अर्ज भरूनही अनेक नावे आलीच नाहीत
मनपा पथकाला चायना मांजा सापडेना
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com