सत्यजित तांबे काँग्रेसचा हात सोडणार?

सोशल मीडियावरील प्रोफाइल बदलले
सत्यजित तांबे काँग्रेसचा हात सोडणार?

अहमदनगर | Ahmednagar

महाराष्ट्रात पदवीधर निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. त्यात नाशिक मतदारसंघ (Nashik Graduate Constituency) हा सर्वात चर्चेत आला आहे. कारण, नाशिकचे मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. पण, ऐनवेळी पक्षाचा आदेश झुगारून तांबे यांनी पुत्र सत्यजीत तांबेंचा (Satyajeet Tambe) अपक्ष अर्ज दाखल केला.

त्यानंतर आता सत्यजीत तांबे यांच्याही निलंबनाचे संकेत देण्यात आहेत. मात्र, कारवाईच्या आधीच सत्यजीत तांबेच काँग्रेस (Congress) सोडण्याची शक्यता आहे. त्यांनी सोशल मीडियावरील आपले प्रोफाइल बदलले असून ट्विटर (Satyajeet Tambe twitter) डीपी आणि बायोमधून काँग्रेस पक्षाचा उल्लेख काढून टाकला आहे. त्यामुळं ते कॉँग्रेसला राम राम करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

याशिवाय, सत्यजीत तांबे यांच्या फेसबुक आणि ट्विटरच्या कव्हर पेजवर एक संदेश झळकत आहे. 'वारसाने संधी मिळते, परंतु कर्तृत्व हे सिद्ध करावचं लागतं' असा मजकूर या संदेशात आहे. या माध्यमातून सत्यजीत तांबे पदवीधर मतदार आणि सामान्य जनतेला साद घालताना दिसत आहेत. आता त्यांचे हे प्रयत्न कितपत यशस्वी ठरणार, हे पाहावे लागेल.

सत्यजित तांबे काँग्रेसचा हात सोडणार?
“राजा का बेटा राजा नही बनेगा” म्हणत, सत्यजीत तांबेंच टेन्शन वाढवणाऱ्या शुभांगी पाटील आहेत तरी कोण?

तसेच सत्यजीत तांबे यांच्यावरील एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जी माणसं माझ्या कठीणकाळात माझ्याबरोबर असतील त्यांना माझा शब्द आहे... 'माझा चांगला काळ फक्त तुमच्यासाठीच असेल' अशी पोस्ट सत्यजित तांबे यांनी केली आहे.

दरम्यान नाशिक पदवीधर निवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झालेला आहे. या निवडणुकीत १६ उमेदवार रिंगणामध्ये आहेत. यात दोन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत होईल. एक म्हणजे सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील (Shubhangi Patil). यातील शुभांगी पाटील याना महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहीर झाला असून तांबे यांना येत्या एक दोन दिवसांत भाजपाचा पाठिंबा जाहीर होऊ शकतो.

दुसरीकडे शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाला आहे. महाविकास आघाडीचा जिल्ह्यात म्हणजेच नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामधल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये प्राबल्य आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळालेल्या शुभांगी पाटील ज्यावेळेस निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरल्या. त्यावेळेसच ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली हे स्पष्ट झालेले आहे.

सत्यजित तांबे काँग्रेसचा हात सोडणार?
'मामा' रुग्णालयात असतांना फडणवीसांनी केले काँग्रेसमधील 'ऑपरेशन'

तर दुसरीकडे सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांना देखील भाजपचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. कारण सत्यजीत तांबे यांचे वडील सुधीर तांबे हे तीन टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी पूर्णपणे हा मतदार संघ बांधलेला आहे. लाखो मतदारांची नोंदणी देखील त्यांनी केलेली आहे. शिवाय नगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांची साथ जर सत्यजीत तांबे यांना मिळाली तर त्यांचं पारडं हे जड होईल.

सुरुवातीला नाशिक पदवीधर निवडणूक ही एकतर्फी वाटत होती मात्र आता कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत शुभांगी पाटील विरुद्ध सत्यजीत तांबे यांच्यातील जमेच्या बाजू कोणत्या आहेत? याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com