नाशिक विभाग पदवीधर मतदार नोंदणीकडे मतदारांची पाठ

मागील वेळेपेक्षा निम्म्याने कमी नोंदणी
नाशिक विभाग पदवीधर मतदार 
नोंदणीकडे मतदारांची पाठ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmendnagar

नाशिक विभाग पद्वीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या करण्याचा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यात 1 ऑक्टोबरपासून मतदान नोंदणी कार्यक्रम सुरु झाला आहे. सोमवार (दि.7) अखेर 31 हजार 414 ऑफलाइन अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, 2017 च्या निवडणुकीत 85 हजार 286 अर्ज नव्याने दाखल झाले होते. त्या तुलनेत यंदा नव मतदारांनी पाठ फिरवली असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

भारतीय निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार 1 नोव्हेंबर 2022 च्या आर्हत दिनांकावर आधारित नाशिक विभाग पदवीधर मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सोमवार (दि.7) ही नव मतदारांना नोंदणीसाठी अखेरची तारखी होती. आता 23 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत त्या प्रारूप मतदार यादीवर दावे आणि हरकती घेता येणार आहेत. हरकतीची छाननी झाल्यानंतर 30 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

पद्वीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी दर सहा वर्षांनी मतदान होते. या निवडणुकांसाठी पात्र शिक्षक तसेच पद्वीधरांनी प्रत्येक वेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते. पद्वीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर 2022 पुर्वी किमान 3 वर्षे आधी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेले नागरिक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. पद्वीधर मतदारसंघासाठी अर्ज क्रमांक 18 भरून पद्वीधर नागरिक मतदार नोंदणी करू शकतात. त्याच प्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर यावर सुध्दा उपलब्ध करुन दिला जाणार आहे. अर्जासोबत पद्वी प्रमाणपत्राची किंवा मार्कशिटची छायांकित प्रत जोडावी लागणार आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक 7 हजार 538 अर्ज संगमनेर विधानसभा मतदारसंघातून तर सर्वात कमी पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 71 अर्ज दाखल झाले आहेत. अकोले 1 हजार 522, शिर्डी 1 हजार 573, कोपरगाव 3 हजार 270, श्रीरामपूर 1 हजार 894, राहुरी 1 हजार 65, नेवासा 1 हजार 997, शेवागव 2 हजार 111, पारनेर 1 हजार 197, श्रीगोंदा 2 हजार 468, कर्जत 2 हजार 129, जामखेड 1 हजार 111 असे एकूण 31 हजार 414 अर्ज दाखल झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com