पोळा सणाच्या उत्सवावर करोनाचे सावट
सार्वमत

पोळा सणाच्या उत्सवावर करोनाचे सावट

माजी आ. नरेंद्र घुलेनी केली सर्जा-राज्याची पूजा

Arvind Arkhade

बक्तरपूर |वार्ताहर| Baktarpur

दरवर्षी ग्रामीण भागात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या वर्षी करोनो महामारीचे सावट असल्याने सर्ज्या-राज्याची वाजत गाजत मिरवणूक न करता घरीच पूजा करण्यात आली. माजी आमदार नरेंद्र घुले यांनी शेवगाव तालुक्यातील दहिगाव-ने येथे सालाबादप्रमाणे सर्ज्या राजाची पुजा करून पारंपारिक पध्दतीने पोळा सण साजरा करण्यात आला.

बारा महिने अन्नादात्यासोबत राबवणार्‍या सर्ज्या राज्याचा सण म्हणजे पोळा. शासनाने कर्ज माफी केली तरी बँकेकडून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. घरामध्ये अन्नधान्य असतानाही लॉकडाऊनमुळे विक्री करता आले नाही. व्यापारी वर्गाकडून हमीभावाप्रमाणे खरेदी करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

शेतकर्‍याच्या हातात फारसा पैसा उपलब्ध झाला नसल्याने शेतकर्यासमोर अनेक आर्थिक संकटाना सामोरे जावे लागले. यावर्षी निसर्गाने सुरुवातीलाच जूनमध्ये दमदार हजेरी लावल्याने खरीप पिकांची वेळेत पेरणी, लागवड करण्यात आली. रासायनिक खताचा तुटवडा जाणवला. शेतकर्‍यांनी खतासाठी तास , दोन तास रांगेत उभे राहून भेटेल तेवढे खत पदरात पाडून घेतले.

खरीप पिके जोमात आलेली असताना गेल्या सात- आठ दिवसापासून सतत होत असलेल्या पाऊसामुळे हातातोंडाशी आलेली पिके निसर्ग हिरावून घेतो की काय, अशी भिती शेतकर्‍यांमधून व्यक्त केली जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com