नारायणडोह शिवारात आढळली तोफगोळासदृश वस्तू

नारायणडोह शिवारात आढळली तोफगोळासदृश वस्तू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नारायणडोह (ता. नगर) शिवारात मंगळवारी सायंकाळी पुरातन तोफगोळासदृश वस्तू आढळून आली आहे. या वस्तूची पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकाने पाहणी केली असून लष्कराच्या अधिकार्‍यांनाही माहिती दिली आहे. लष्कराचे अधिकारीही या वस्तुची तपासणी करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

नारायणडोह गावच्या शिवारात पारगाव फाट्याजवळ बांगरवस्ती येथे मुरूमामध्ये तोफगोळा सदृश गोल आकाराची लोखंडी वस्तू दिसून आली. नगर तालुका पोलीस, बॉम्ब शोधक पथकाला याबाबतची माहिती देण्यात आली. बॉम्बशोधक पथकाने तोफगोळा सदृश वस्तूची पाहणी केली.

स्फोटक शोधक यंत्राच्या साहाय्याने केलेल्या पाहणीत या लोखंडी वस्तुमध्ये कोणताही स्फोटक पदार्थ नसल्याचे आढळून आले आहे. उपनिरीक्षक रणजित मारग यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून लष्कराच्या अधिकार्‍यांनाही माहिती देण्यात आली असून लष्कराचे पथक या वस्तुची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचे सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com