नारायणडोह शिवारात आढळली तोफगोळा सदृश वस्तू

नारायणडोह शिवारात आढळली तोफगोळा
सदृश वस्तू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नारायणडोह (ता. नगर) शिवारात रविवारी दुपारी पुरातन तोफगोळासदृश वस्तू आढळून आली आहे. या वस्तूची नगर तालुका पोलिसांसह बॉम्बशोधक पथकाने पाहणी केली असून ती तोफगोळासदृश वस्तू ताब्यात घेण्यात आली आहे. ती निकामी करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

नारायणडोह गावच्या शिवारा बाबासाहेब फुंदे यांच्या शेतामधील मुरूमामध्ये तोफगोळा सदृश गोल आकाराची लोखंडी वस्तू दिसून आली. नगर तालुका पोलीस, बॉम्ब शोधक पथकाला याबाबतची माहिती देण्यात आली. बॉम्बशोधक पथकाने तोफगोळा सदृश वस्तूची पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून लष्कराच्या अधिकार्‍यांनाही माहिती देण्यात आली असून लष्कराचे बॉम्ब नाशक पथकाला या वस्तुची पाहणी करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. त्यांच्या मदतीने ही तोफगोळा सदृश वस्तू निकामी करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com