
वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur
शहरालगत नारंगी सारंगी धरणात (Narangi Sarangi Dam) पडून बुडल्याने एका तरुणाचा मृत्यू (Youth Death) झाल्याची घटना सोमवार (दि. 2) रोजी सकाळी घडली.
तुषार बाबासाहेब बोडखे (वय 20 रा.पाटील गल्ली वैजापूर) असे या घटनेत मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवार (दि. 2) रोजी तुषार हा नारंगी सारंगी धरणाच्या (Narangi Sarangi Dam) पाण्यात पडल्याने त्याला संजय सुखदेव बोडखे यांनी बेशुद्ध अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी वैजापूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष सोनवणे हे करीत आहे.