
जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed
जामखेड (Jamkhed) तालुक्यातील नान्नज रोडवर (Nannaj Road) झिक्री शिवारात मोटारसायकल व स्विफ्ट कारची (Bike And Car Accident) समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर एक गंभीर अवस्थेत असल्याने त्याला नगर (Ahmednagar) येथील एका खाजगी हॉस्पिटलला हलविण्यात आले आहे. तर एकाला जामखेड (Jamkhed) येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
सविस्तर माहिती अशी की, मोटारसायकल व स्विफ्ट कार यांची झिक्री शिवारातील लोकसेवा मंगल कार्यालयासमोर समोरासमोर जोरदार धडक (Bike And Car Accident) झाल्याने मोटारसायकलवरील इंजमाम अहमद पठाण (वय 23 रा. नान्नज ता.जामखेड) हा तरूण जागीच ठार (Youth Death) झाला तर सोहेल मस्जिद पठाण (वय 22) व मुदस्सिर मस्जिद पठाण (वय 18) हे तरूण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये (Hospital) उपचार सुरू आहेत. तर मयत इंजमाम अहमद पठाण याच्यावर जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलीस स्टेशनचे (Jamkhed Police Station) पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब तागड हे तपास करीत आहेत तर त्यांना पोलीस नाईक अजय साठे, पो. शेकडे, हे सहकार्य करत आहेत.