नांदुर्खीत बिबट्याची दहशत; वनविभाग मात्र सुस्त

नांदुर्खीत बिबट्याची दहशत; वनविभाग मात्र सुस्त

नांदुर्खी |वार्ताहर|Nandurkhi

राहाता तालुक्यातील नांदुर्खी बुद्रुक व खुर्द येथील वाड्यावस्त्यावरअनेक महिन्यांपासून बिबट्याने दहशत केली असून रात्री अपरात्री वाड्या वस्त्यांवर कुत्रे व शेळ्या यांच्यावर हल्ला चढवत असल्याने अनेक पाळीव प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. दाभाडे मळा, चौधरी वस्ती, वाणी वस्ती येथे पाळीव कुत्रे, शेळी, वासरे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला आहे. या भागातील बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करून नागरिकांची भीती कमी करावी, अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहेत.

मोहनराव दाभाडे, सोमनाथ वाणी, जालिंदर वाणी, अप्पासाहेब वाणी, बाबासाहेब चौधरी, संजय चौधरी, शिवाजी चौधरी, राजेंद्र दाभाडे, प्रकाश वाकचौरे या शेतकर्‍यांनी वनाविभागाकडे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे. शेतकरी बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत.

तेव्हा वनविभागाने पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानदेव चौधरी, माजी सरपंच राजेंद्र चौधरी, कचेश्वर चौधरी, बाबासाहेब अनर्थे, मोहन दाभाडे, बाबासाहेब चौधरी, अशोक कोळगे, संजय वाकचौरे, भानुदास चौधरी आदींनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com