नांदुर्खीत एकाच शेतकर्‍याच्या तीन शेळ्यांचा बिबट्याने पाडला फडशा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदुर्खी |वार्ताहर| Nandurkhi

राहाता तालुक्यातील नांदूरखी खुर्द व बुद्रुक या भागातील शेतकर्‍यांच्या वाड्या वस्त्यांवर बिबट्याने धुमाकूळ घातल्याने या भागातील लहान मुले व शाळकरी बालक धास्तावून गेले आहेत. नांदूर्खी खुर्द येथील शेतकरी रमेश भानुदास वाणी वस्तीवर राहतात. त्यांच्या गोठ्यात असलेल्या तीन शेळ्यांचा बिबट्याने शनिवारी पहाटे 4 च्या सुमारास फडशा पाडला.

दोन वर्षांपासून या भागातील शेळी, कुत्रे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडत आहेत. वनविभागाचे अधिकारी येऊन पंचनामा करतात. शासनाची नुकसान भरपाई खात्यात जमा होईल असे सांगून वेळ मारून नेतात. मात्र या भागातील शेतकरी, महिला, शाळेत जाणारी लहान बालके यांनी बिबट्याची दहशत घेतली आहे.

वनविभागाचे अधिकारी पिंजरा लावून संबंधित बिबट्याला कधी जेरबंद करणार असा नागरिकांनी उपस्थित केला आहे. नांदूरर्खी सोसायटीचे अध्यक्ष जालिंदर वाणी, अध्यक्ष ज्ञानदेव चौधरी, राजेंद्र चौधरी, संजय चौधरी, मोहन दाभाडे, कचेश्वर चौधरी, शिवाजी चौधरी, भाऊसाहेब चौधरी, भाऊसाहेब वाणी, सुनील वाणी, वसंतराव दाभाडे आदी शेतकर्‍यांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे.

वाणी वस्तीजवळ रविवारी सकाळी पुन्हा गवताच्या शेतात बिबट्या दबा धरून बसल्याचे संगीता रमेश वाणी यांनी पाहिले. त्या अक्षरशः धास्तावून गेल्या. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा पाटील यांना त्यांनी दूरध्वनीद्वारे बिबट्याची माहिती दिली. बिबट्या आमच्या लहान मुलांवर हल्ला करेल. पिंजरा लावा अशी विनंती केली. मात्र प्रतिभा पाटील यांनी तुम्ही फटाके वाजवा बिबट्या धूम ठोकून पळून जाईल असे पोकळ आश्वासन दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com