नांदुर्खीतील रुसलेले कावळे पुन्हा परतले !

बंद पडलेले दशक्रियाविधी पुन्हा होवू लागले
नांदुर्खीतील रुसलेले कावळे पुन्हा परतले !

नांदुर्खी |वार्ताहर| Nadurkhi

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) नांदुर्खी बुद्रूक (Nandurkhi Budruk) येथील गोदावरी उजव्या कालव्याजवळ (Godavari Right Canal) असलेल्या श्रीकृष्ण मंदिर येथील दशक्रियाविधी घाटाजवळ विद्युत वाहक तारांना (Electrical conductor wires) एक कावळा (crow) विजेच्या तारेला लटकून मृत्युमुखी पडला होता. तेव्हापासून पिंडदानाच्या वेळी काक स्पर्श करण्यावर बहिष्कार घातलेल्या कावळ्यांनी नुकताच आपला बहिष्कार मागे घेतल्यामुळे नांदुर्खीच्या घाटावर (Nandurkhi Ghat) पुन्हा दशक्रियाविधी पार पाडत आहेत.

तीन वर्षापूर्वी दुःखद घटनेनंतर परिसरात असणार्‍या कावळ्यांनी (crow) पिंड दानाच्यावेळी काक स्पर्श करण्यावर बहिष्कार टाकला. त्यामुळे येथील व शिर्डी (Shirdi) परिसरातील दुःखद झालेल्या मयताच्या नातेवाईकमध्ये एक गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. काक स्पर्श होत नसल्याने अनेक लोकांनी पुणतांबा येथील गोदावरीच्या तीरावर काक स्पर्श किंवा पिंड दान करण्याचा पायंडा सुरु केला. नांदुर्खी खुर्द (Nandurkhi Khurd), डोर्‍हाळे (Dorhale), शिर्डी (Shirdi) व नांदुर्खी बुद्रुक (Nandurkhi Budruk) परिसरातील लोकही पिंडदानाचा विधी पुणतांबा (Puntamba) या ठिकाणी करत होते.

गेली तीन वर्षांपासून याठिकाणी काक स्पर्श होत नसल्याने दशक्रियाविधीवर कावळ्यांनी बहिष्कार टाकला की काय असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला होता. मात्र काही दिवसांपासून या पवित्र ठिकाणी काकस्पर्श होत असल्याने इतर ठिकाणी दशक्रियाविधीला जाणे टाळत आहे. यामुळे पुन्हा नांदुर्खी या ठिकाणी एकाच दिवशी कधी कधी पाच पाच दशक्रियाविधी संपन्न होऊ लागले आहे.

करोनामहामारीमुळे सरकारने लागू केलेले कडक निर्बध नुकतेच उठविले आहेत. या कावळ्यांनी केंद्र आणि राज्याच्या नियमांचे पालन करून आता मुक्त संचार केला आहे की काय असेही या ठिकाणी बोलले जात आहे. या घाटावरील पुन्हा दशक्रियाविधीची गर्दी पाहून या भागातील मृत पावलेल्या नातेवाईकांच्या मनामध्ये दुःखाचा विरह सहन करताना काकस्पर्श होऊ लागल्याने काही प्रमाणात समाधान दिसत आहेत.

या दशक्रिया घाटावर महिलांना कपडे बदलण्यासाठी आमच्या आजी स्व. नानीबाई बाजीराव कोते यांच्या स्मरणार्थ व्यवस्था केलेली आहे. या पुढेही माणुसकीच्या भावनेतून काही मदत असल्यास आपण सहकार्य करू.

- विजयराव कोते, अध्यक्ष साई निर्माण ग्रुप शिर्डी.

विद्युत संचाच्या तारांना गेली काही वर्षांपूर्वी एक कावळा लटकून मृत्युमुखी पडल्याने या ठिकाणी काकस्पर्श होत नव्हता. मात्र आता या ठिकाणी काकस्पर्श होऊ लागल्याने गरीब कुटुंबाला बाहेर ठिकाणी जाण्याचा ताण कमी होणार आहे.

- ज्ञानदेव चौधरी, माजी सरपंच, नांदुर्खी.

शिर्डी भागातील अनेक दशक्रिया विधी नांदुर्खी घाटावर संपन्न होत असतात. बर्‍याच लोकांना अन्य ठिकाणी जाणे किंवा वेळेचे बंधन असल्याने सदर विधीला जाण्याची इच्छा असतानाही टाळाटाळ होत असे. आपण नगराध्यक्ष असताना या भागातील घाट सुशोभीकरणासाठी मदत केली असून यापुढेही आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा भाग सुशोभीत करण्याचा प्रयत्न करू.

- कैलास बापू कोते, माजी नगराध्यक्ष, शिर्डी नगरपंचायत.

श्रीकृष्ण मंदिर हे गोदावरी कालव्याच्या कडेला असल्याने अनेक वर्षांपासून शिर्डी, बिरेगाव, कोर्‍हाळे, नांदुर्खी या भागातील दशक्रियाविधी या ठिकाणी संपन्न होतात. यापुढेही येथे चांगल्या पद्धतीने धार्मिक विधी संपन्न होतील.

- अर्जुनराव चौधरी, चेअरमन, झोटिंगबाबा दूध संस्था.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com