नांदेड-पुणे एक्स्प्रेस रेल्वेच्या वेळेत व स्थानकात बदल

नांदेड-पुणे एक्स्प्रेस रेल्वेच्या वेळेत व स्थानकात बदल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नांदेड-पुणे एक्स्प्रेस (ट्रेन नंबर 12730) या रेल्वेच्या वेळेत व स्थानकात बदल झाला असून पुण्याकडे जाणारी बेलापूर स्टेशनची पूर्वीची वेळ 5.40 वाजेची होती. नवीन वेळेनुसार ती आता रात्री 3 वा. असणार आहे. ही गाडी आता हडपसरपर्यंतच जाणार आहे. हडपसर येथे पोहचण्याची वेळ सकाळी 6.57 वा. तसेच परतीचा प्रवास पुणे नांदेड एक्स्प्रेस (12729) ही आता पुण्यावरून न सुटता हडपसर येथून रात्री 10.00 वा. सुटेल.

नांदेड-पुणे एक्स्प्रेस रेल्वेच्या वेळेत व स्थानकात बदल
हॉटेलमध्ये काम करणारा तरुण आता 25 कोटींचा झाला मालक

नांदेड पुणे एक्स्प्रेसचे (ट्रेन 12730) सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे असून नांदेड येथून ती दर रविवारी व मंगळवारी संध्याकाळी 6.30 वाजता सुटेल. या रेल्वेला पूर्णा 7. वा. परभणी 7.30 वा. सेलू 8.00 वा. परतूर 8.20 वा. जालना 9.10 वा. औरंगाबाद 10.20 वा. मनमाड 1.15 (मध्यरात्री), कोपरगाव 2.20 वा. बेलापूर (श्रीरामपूर) 3.00 वा. अहमदनगर 3.58 वा. दौंड कोड लाईन 5.40 वा. हडपसर 6.55 वा. (सोमवार व बुधवार) असे थांबे असणार आहेत, अशी माहिती रेल्वे सल्लागार समितचे सदस्य जयकिशन तलरेजा यांनी दिली.

Related Stories

No stories found.