श्रीरामपूर : सईदाबाद नामकरणास स्थानिक नागरिकांचा विरोध

नामकरणाची कमान तात्काळ काढण्याची मागणी
श्रीरामपूर : सईदाबाद नामकरणास स्थानिक नागरिकांचा विरोध

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील वार्ड नं. 1 परिसरातील खबडी येथील सईदाबाद नामकरणास नकगरिकांनी विरोध दर्शवत नामकरण रद्द करून त्याची कमान तात्काळ काढण्यात यावी, तसेच खबडी परिसराला पुर्वीचे आहे तेच नाव राहू द्यावे, अशा मागणीचे निवेदन नागरिकांनी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांना दिले.

नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर नगरपरिषदेतंर्गत वार्ड नं. 1 मधील खबडी परिसर हा सुमारे 100 वर्षांपासून नामांकीत आहे. या ठिकाणी खबडी बाबाचे मंदिर असून दरवर्षी उत्सवही भरतो. या ठिकाणी बहुतांशी हिंदु धर्माचे स्थानिक रहिवाशी असून त्यांच्या खाजगी मालमत्ता आहेत. आजही त्यांच्या मालमत्तांची सरकारी दरबारी नोंद आहे. या परिसरातील सर्व व्यवहार हे खबडी परिसर या नावानेच आहेत.

मात्र नगरपरिषदेच्या सत्ताधार्‍यांनी राजकीय स्वहित साधण्यासाठी या परिसराचे नामकरण करून लोखंडी कमानीची उभारणी केली. ही कमान उभारणीदरम्यान वाद निर्माण झाला आहे. मात्र सत्ताधार्‍यांनी जाणिवपुर्वक तेढ निर्माण होईल या हेतूनी हा प्रयत्न केला. सदरच्या नामकरणाची हिंदु धर्मीयांना व इतर धर्म जातीच्या स्थानिक नागरीकांना माहिती नसतांना खबडी परिसराचे नामकरण करून कमानीचेही उद्घाटन केले. त्यामुळे शहरामध्ये जातीय तेढ निर्माण होवून समाजामध्ये शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदरील कमान तात्काळ काढण्यात यावी, तसेच खबडी परिसराला पुर्वीचे आहे तेच नाव ठेवावे, नाव बदलास स्थानिक नागरीकांचा तीव्र विरोध आहे.

त्यामुळे सदरील कमान तात्काळ काढुन घ्यावी तसेच केलेले नामकरण रद्द करावे, तसे न केल्यास वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर होणार्‍या सर्व परिणामांस नगरपरिषदेचे प्रशासन तसेच संबंधित लोकप्रतिनिधी, नगरसेवक जबाबदार राहतील, असा इशारा प्रविण सयराम शेळके, सागर बाळासाहेब कुदळे व स्थानिक नागरीकांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com