1 जुलै नंतरच्या नावांचा अन्न सुरक्षा योजनेत समावेश करावा - कोल्हे

1 जुलै नंतरच्या नावांचा अन्न सुरक्षा योजनेत समावेश करावा - कोल्हे
स्नेहलता कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहर (Kopargav City) आणि विधानसभा मतदार संघातील (Assembly constituency) 1 जुलै 2019 नंतरच्या नविन व विभक्त झालेल्या शिधापत्रिकाधारकांच्या (Ration card Holder) नावाचा समावेश अन्न सुरक्षा योजनेत (Food Security Plan) करून त्यांना तातडीने शिधा वाटप करावा अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे (BJP state secretary Snehlata Kolhe) यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ (Food and Civil Supplies Minister Chhaganrao Bhujbal) यांच्याकडे केली आहे.

त्यांनी पत्रात म्हटले आहे, कोपरगाव विधानसभा मतदार संघातील 1 जुलै 2019 नंतर अनेक नागरिकांनी नविन तसेच विभक्त शिधापत्रिका धारण केल्या आहेत. मात्र त्यांना पंतप्रधान मोफत व राज्य शासनाचा शिधा मिळत नसल्याच्या असंख्य शिधापत्रिकाधारकांनी आपल्याकडे तक्रारी केल्या आहे. त्याबाबत तहसीलदार विजय बोरूडे यांच्याशी देखील चर्चा केली आहे. सध्या करोना महामारीमुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

तरी या शिधापत्रिकाधारकांचा अन्न सुरक्षा योजनेत तातडीने समावेश करून त्यांना पंतप्रधान व राज्य शासन शिधा लाभ द्यावा. या मागणीचे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे पाठविले आहे.

Related Stories

No stories found.