'नागवडे'ने ऊस उत्पादकांना तातडीने उर्वरीत एफआरपी अदा करावी - केशवराव मगर

'नागवडे'ने ऊस उत्पादकांना तातडीने उर्वरीत एफआरपी अदा करावी - केशवराव मगर

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

'नागवडे'चा (Nagwade Sugar Factory) हंगाम संपून दोन महिने उलटले आहेत. मात्र ऊस उत्पादक (Sugarcane Growers) व वाहतूकदारांना कारखान्याने अद्यापही बिले अदा केलेली नाहीत. सध्या शेतक-यांना पैशाची निकड आहे. 'नागवडे' कारखान्याने (Nagwade Sugar Factory) तातडीने उर्वरीत 351 रुपयांची ऊस बीले (Sugarcane Bill) शेतक-यांना अदा करावीत अशी मागणी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशवराव मगर (Keshavrao Magar) यांनी केली आहे. तसेच तोडणी व वाहतूक बीलेही तातडीने अदा करण्याची मागणी (Demand) त्यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना मगर म्हणाले की, ऊस उत्पादकांना ऊसाचे गाळप झाल्यानंतर चौदा दिवसात एफआरपीनुसार (FRP) ऊस बीले अदा करणे बंधनकारक आहे. 'नागवडे' कारखान्याचा (Nagwade Sugar Factory) गाळप हंगाम (Crushing Season) बंद दोन महिन्यापूर्वीच संपला असतानाही कारखान्याने एफआरपीची (FRP) संपूर्ण रक्कम शेतक-यांना अद्याप अदा केलेली नाही. सध्या शेतक-यांना मशागतीची कामे, बी-बियाणे, खते व ऊस बेणे खरेदीसाठी पैशाची निकड आहे. शिवाय जिल्हा सहकारी बँक (District Co-Operative Bank), सेवा संस्था व अन्य बँकांची कर्ज शेतक-यांना 30 जूनपूर्वी भरावी लागणार असल्याने 'नागवडे' कारखान्याने (Nagwade Sugar Factory) एफआरपीतील (FRP) उर्वरीत 351 रुपयांचा एकरकमी हप्ता तातडीने ऊस उत्पादकांना (Sugarcane Growers) अदा करावा अशी आपली मागणी असल्याचे मगर यांनी म्हटले आहे.

जिल्यातील व जिल्ह्याबाहेरील सर्व सहकारी व खासगी कारखान्यांनी कमिशन डिपाॅझीटसह तोडणी, वाहतुक बीले अदा केली आहेत. मात्र 'नागवडे' कारखान्याने त्यांची बीले रखडून ठेवली आहेत. ऊस उत्पादकांना (Sugarcane Growers) एफआरपीचा (FRP) उर्वरीत हप्ता अदा करतानाच वाहतुकदारांची बीलेही कमिशन, डिपाॅझीटसह तातडीने अदा करावीत अशी मागणी मगर यांनी केली असून कारखाना व्यवस्थापनाने वेळकाढूपणाचे धोरण घेतल्यास आंदोलन (Movement) करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com