श्रीगोंदा कारखान्यासाठी शुक्रवारी मतदान

श्रीगोंदा कारखान्यासाठी शुक्रवारी मतदान

23 हजार मतदार, प्रशासनाची तयारी पुर्ण

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) सहकारी साखर कारखान्याच्या संचालकमंडळच्या 21 जागांसाठी शुक्रवारी (दि.14) संक्रातीच्या दिवशी मतदान होत आहे. सहकार विभागाने या निवडणुकीची तयारी पुर्ण केली आहे.

कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांना सोपी वाटणारी कारखाना निवडणूक त्यांचेच एकेकाळचे सहकारी केशवराव मगर यांनी कसोटीची करून ठेवली आहे. त्यात त्यांना आमदार बबनराव पाचपुते यांची मदत मिळत असल्यामुळे नागवडे कुटुंबाला कारखाना निवडणुकीत आपली सत्ता कायम ठेवत पुढील राजकीय परिस्थिती ची दिशा ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागणार असल्याचे चित्र आहे. या कारखान्याच्या निवडणुकीने तालुक्यातील अनेक राजकीय समिकरणे बदलणार आहेत.

सहकार महर्षी नागवडे साखर कारखान्याच्या 14 जानेवारी रोजी होणार्‍या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी राजेंद्र नागवडे यांच्या किसान क्रांती पॅनल विरुद्ध आ. बबनराव पाचपुते व माजी उपाध्यक्ष केशव मगर यांच्या सहकार विकास पॅनल अशी 21 विरुध्द 21 अशी सरळ लढत होणार आहे. तर दोन अपक्ष उमेदवार आहेत. यामुळे 21 जागांसाठी 44 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. या निवडणुकीत आमदार बनबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते स्वतः उमेदवार आहेत.

माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार ,बाळासाहेब नाहटा ही मंडळी नागवडे विरोधात उभी ठाकली आहेत. नागवडे नी ही जेष्ठ नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस याना उमेदवारी देत रिंगणात उतरवले आहे.यासह काही आजी माजी संचालकांना पुन्हा संधी दिल्याचे चित्र आहे. 14 जानेरीला ऐन संक्रातीच्या दिवशी 21 जागांसाठी मतदान होत असून सर्व 44 उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद होणार आहे. या निवडणुकीकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीत काही गोंधळ होऊनये तसेच शांततापुर्ण वातावरणात मतदान पार पडावे यासाठी श्रीगोंदा पोलीसांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

- अशी मतदान केंद्र

श्रीगोंदा गट : श्रीगोंदा, मढेवडगाव, भानगाव, पारगाव सुद्रीक, तांदळी दुमालामध्ये मतदान केंद्र आहे.

काष्टी गट : काष्टी, वांगदरी, सांगवी दुमाला, निमगाव खलू.

कोळगाव गट : कोळगाव, घारगाव, पिंपळगाव पिसा, तांदळी, इनामगाव, मांडवगण फराटा (ता.शिरूर).

बेलवंडी गट : लोणी व्यंकनाथ, उककडगाव ,हंगेवाडी, येळपणे मध्ये मतदान केंद्र आहे.

टाकळी कडेवळीत गट : टाकळी, हिरडगाव, आढळगाव, पेडगाव, शेडगावमध्ये मतदान आहे.

लिंपणगाव गट : लिंपणगाव, कौठा, अजनुज अशी मतदान केंद्र आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com