नागवडे कारखान्याची एफआरपी रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग

नागवडे कारखान्याची एफआरपी रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने (Co-operative Maharshi Shivajirao Narayanrao Nagwade Co-operative Sugar Factory) सन 20-21 या गाळप हंगामात (Threshing season) गाळप केलेल्या ऊस बिलाची अंतीम एफआरपीची (FRP) 144.40 प्रती मेट्रीक टनाप्रमाणे सोमवार दि. 4 रोजी ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे (Director Rajendra Nagwade) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

नागवडे (Nagwade) म्हणाले की, या गळीत हंगामात कारखान्याने 7 लाख 2 हजार पाचशे सात मे.टन उसाचे गाळप केले असून कारखान्याने पहिला हप्ता 2100 रुपये प्र. मे.टन, दुसरा हप्ता 200 रुपये प्र. मे. टनाप्रमाणे असा मिळून 2300 रुपये रक्कम शेतकर्‍यांना अदा केली आहे. उर्वरीत रु. 144.40 प्र.मे. टनाप्रमाणे अंतीम एफआरपीची (FRP) रक्कम सोमवारी (दि.4) शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. समितीने संबंधित कारखान्याचे गाळप, उत्पादन खर्च, साखरेचा उतारा, ऊस तोडणी वाहतूक खर्च इत्यादी बाबींचा अभ्यास करून शासनास अहवाल सादर केला.

त्यानुसार नागवडे कारखान्याची एफआरपी (FRP of Nagwade factory) 2444.40 रुपये प्र.मे.टन एवढी निश्चीत करण्यात आलेली आहे. त्यानुसार नागवडे कारखान्याकडून शेतकर्‍यांना एकूण 10.14 कोटी रुपये ऊस पेमेंटची रक्कम अदा करण्यात येत आहे. त्या पुर्वीच्या हंगामात कारखाना बंद असताना व सहवीज निर्मिती प्रकल्पाचे काम केलेले असताना सुध्दा कारखान्याने जिल्ह्यात दोन नंबरचा भाव दिलेला आहे. येत्या दिवाळीत सभासदांना (member) 20 रुपये प्रमाणे 10 किलो साखर व कामगारांना 5 किलो साखर सवलतीच्या दराने वाटप करण्यात येणार आहे. सन 2021-22 चा गळीत हंगामाची सर्व तयारी पूर्ण झाली असून यावर्षी 9 लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून ऊस भावाबाबत आघाडीवर राहण्याचा प्रयत्न राहणार आहे. यासाठी शेतकरी व सभासदांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजेंद्र नागवडे (Director Rajendra Nagwade) यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.