विरोधकांकडून माझ्यावर होणारे आरोप बिनबुडाचे

राजेंद्र नागवडे : मगर यांच्याकडून कारखाना सभासदांची दिशाभूल
विरोधकांकडून माझ्यावर होणारे आरोप बिनबुडाचे

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

नागवडे सहकारी कारखान्याचे (Nagwade Co-operative Factory) नाव जिल्ह्यासह राज्यातील सहकारात आगळे वेगळे आहे. या कारखान्याचे सर्व निर्णय संचालकांना विचारात घेऊन, चर्चा करूनच घेतले जातात. घेतलेल्या सर्व निर्णयामागे सभासद (member) तसेच कारखान्यांचे हित लक्षात घेतले जाते. विरोधकांनी केलेले सर्व आरोप हे निराधार असून कराड (Karad) येथील साखर कारखाना (Sugar Factory) माझ्या मालकीचा असल्याचे सिद्ध केल्यास मी नागवडे कारखान्याच्या चेअरमन पदाचा राजीनामा देईल, असे प्रत्युत्तर नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे (Nagwade Factory Chairman Rajendra Nagwade) यांनी विरोधकांना दिले आहे.

श्रीगोंदा कारखान्यावर (Shrigonda Factory) झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नागवडे (Rajendra Nagwade) म्हणाले, केशव मगर (Keshav Magar) हे कारखान्याच्या उपाध्यक्ष पदावर असताना त्यांनी कारखान्यासाठी एक तास देखील वेळ दिला नाही. संचालक मंडळाच्या कोणत्याही बैठकीत मगर व अण्णासाहेब शेलार (Annasaheb Shelar) यांच्याशी वाद झालेला नाही. माझी त्यांच्याशी कोणतेही व्यक्तीगत वितुष्ठ नाही. नागवडे सहकारी कारखान्यात (Nagwade Co-operative Factory) शिवाजीबापूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन संचालक मंडळात सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. उलट मगर यांनी शेतकर्‍यांची कामधेनू असलेल्या नागवडे कारखान्याचे (Nagwade Co-operative Factory), तसेच सभासदाचे हित जोपासून कारखान्यांची बदनामी करू नये. त्यांनी शहनिशा करून आरोप करावेत.

नागवडे कारखाना (Nagwade Co-operative Factory) मागील वर्षी बंद असल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र, यावर्षी कारखाना चालू करून फायद्यात आणत कारखाना नफ्यात आणला. तसेच चालू वर्षी झालेल्या लेखा परीक्षण अहवालात कारखान्याला अ दर्जा प्राप्त केल्याचे नागवडे यांनी यावेळी सांगितले. कारखान्यात 255 कामगार पर्मनंट असून त्यांचे व कंत्राटी कामगारांचे हाल होऊ नये, म्हणून मागील वर्षी कारखाना बंद असताना कामगारांची उपासमारी होऊ नये, म्हणून त्यांना 50 टक्के पगार दिला. त्याचप्रमाणे जे कामगार इच्छुक होते, त्या कामगारांनी दुसर्‍या कारखान्यात जाऊन काम केल्याने त्यांना अधिकचा पगार मिळाला असे नागवडे (Nagwade Co-operative Factory) यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com