कारने दुचाकीला ७० फूट नेलं फरपटत, काका पुतणीचा दुर्देवी मृत्यू

कारने दुचाकीला ७० फूट नेलं फरपटत, काका पुतणीचा दुर्देवी मृत्यू

वैजापूर | प्रतिनिधी

वैजापूर तालुक्यात नागपूर-मुंबई महामार्गावर विरोबा मंदिरा समोर एका बोलेरो कारने दुचाकीला धडक दिली. धडक लागून दुचाकीस्वार काका आणि पुतणीचा दुर्देवी मृत्यू झाला. धडक एवढी भीषण होती की कारने दुचाकीला फरफटत नेले. या मध्ये नारायण कारभारी शेळके (वय ४५ वर्षे) आणि पूजा वेणुनाथ शेळके (वय २१ वर्षे) यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील नागपूर मुंबई महामार्गावर बिरोबा मंदिर समोर वैजापूरहून पालखेडला दुचाकी क्रमांक MH 20 FE 4061 वरून जात असताना लासूरहून वैजापूरच्या दिशेने येणाऱ्या बोलेरो गाडी क्रमांक MH 25 R 3554 यांची विरोबा मंदिर समोर समोरासमोर धडक झाली. या धडकेनंतर बोलेरो गाडीने दुचाकीला ७० फूट लांब पर्यंत फरफटत नेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली आहे.

कारने दुचाकीला ७० फूट नेलं फरपटत, काका पुतणीचा दुर्देवी मृत्यू
Earthquake : दिल्ली पाठोपाठ मध्यप्रदेशात भूकंपाचे धक्के, भीतीने लोक घराबाहेर पडले

या अपघातात दुचाकीस्वार नारायण कारभारी शेळके व त्यांची पुतणी पूजा वेणूनाठ शेळके हे गंभीर जखमी झाले होते. जखमींना जवळ पास असलेल्या वस्तीवरील राजेंद्र आहेर, गौरव जाधव, अमोल आहेर, नितीन डुकरे, रामभाऊ आदमाने यांच्या सोबत शिवराई येथील काही नागरिकांनी तत्काळ एका खासगी वाहन थांबवत त्याद्वारे उपचाराकरिता वैजापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविले,परंतु डॉक्टरांनी या दोघांना तपासून मृत घोषित केले

कारने दुचाकीला ७० फूट नेलं फरपटत, काका पुतणीचा दुर्देवी मृत्यू
ऊस तोडणी यंत्र खरेदीला ४० टक्के अनुदान; काय आहेत अटी व शर्ती?

घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रज्जाक शेख व संतोष सोनावणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणी वैजापूर पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपस वैजापूर पोलीस करीत आहे.

दरम्यान दोन आठवड्यांपूर्वी याच गावातील ४ जणांचा कायगाव टोका येथे बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच या अपघाताने पुन्हा एकदा गावावर शोककळा पसरली असून तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे

कारने दुचाकीला ७० फूट नेलं फरपटत, काका पुतणीचा दुर्देवी मृत्यू
रस्त्यात बंद पडलेल्या गाडीला खा. विखेंचा ‘दे धक्का’; सोशल मीडियावर होतंय कौतुक
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com