नागेबाबा पतसंस्थेत आणखी दोन किलो बनावट दागिने

69 लाखांची फसवणूक || 32 खात्यांची तपासणी
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणातील फसवणुकीचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. संत नागेबाबा मल्टिस्टेट सोसायटीमध्ये आणखी दोन किलो बनावट दागिने आढळून आले आहेत. त्याव्दारे 69 लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अटक केलेल्या पाचही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

शहर बँकेत सुमारे साडेनऊ किलो बनावट दागिने आढळले आहेत. त्याव्दारे बँकेची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यानंतर नागेबाबा मल्टिस्टेट सोसायटीमध्ये सुमारे अडीच किलो वजनाचे बनावट दागिने आढळून आले. त्याव्दारे 79.19 लाखांची फसवणूक झाली आहे. आता आणखी कर्जदारांची खाती तपासणी केली जात आहेत. त्यामुळे फसवणुकीचा आकडा वाढत आहे.

सोमवारी रात्री व मंगळवारी दिवसभरात आणखी 13 जणांची 32 खाती तपासण्यात आली. त्यात दोन किलो 10 ग्रॅम वजनाचे बनावट दागिने आढळून आले. त्याव्दारे 69 लाख तीन हजार रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. दरम्यान, नागेबाबा सोसायटीत आत्तापर्यंत साडेचार किलो बनावट दागिने आढळून आले असून, फसवणुकीची रक्कम सुमारे दीड कोटींवर पोहचल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com