नागवडे कारखाना निवडणूक : निकाल उद्या, मात्र फटाके आजच

सेवा संस्था मतदार संघात विजयाचा दावा करत जल्लोष
नागवडे कारखाना निवडणूक : निकाल उद्या, मात्र फटाके आजच

श्रीगोंदा | प्रतिनिधी

नागवडे कारखाना संचालक मंडळ निवडणुकीसाठी मतदान सुरू असून मतदानाला संमिश्र प्रतिसाद मिळत असताना सेवा संस्था मतदार संघात राजेंद्र नागवडे विरोधात बाळासाहेब नाहटा अशी लढत होत आहे.

सेवा संस्था मतदार संघात ४१ मतदार असून यात ४० मतदान झाले असून एक जण मतदान करण्यास येणार असले तरी दोन्ही बाजूने विजयाचे दावे करण्यात येत असून नागवडे आणि मगर समर्थक नाहटाचे कार्यकर्ते दोन्ही बाजुंने विजयाचे दावे प्रतिदावे करत असून दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत फटाके फोडले आहेत.

दुपारी बारा वाजेपर्यत एकूण २८.९०% मतदान झाल्याची माहिती तहसील कार्यालयातुन मिळाली आहे. दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढणार असल्याचे दिसून येते.

गट निहाय झालेले मतदान खलील प्रमाणे

श्रीगोंदा गट - २६.३२%

काष्टी गट - ३३.०४%

कोळगाव गट - २७.१८%

बेलवंडी गट - ३१.१३%

टाकळी कडेवळीत गट - २८.४५%

लिंपणगाव गट - २५.७६%

सहकारी संस्था - ९७.५६%

एकूण मतदान टक्केवारी - २८.९०%

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com