अकोले, शेवगाव, कर्जत, पारनेर, जामखेड नगरपंचायतची निवडणूक प्रक्रिया सुरू

प्रारूप मतदारयाद्या 16 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार
अकोले, शेवगाव, कर्जत, पारनेर, जामखेड नगरपंचायतची निवडणूक प्रक्रिया सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विविध जिल्ह्यांमधील 95 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच इतर विविध 31 नगरपरिषदा,

नगरपंचायतींमधील 35 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 15 फेब्रुवारी 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी येथे दिली. यात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, कर्जत, पारनेर, जामखेड, शेवगाव नगरपंचायतींचा समावेश आहे. या निमित्ताने राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे.

श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 15 जानेवारी 2021 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 15 फेब्रुवारी 2021 रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 1 मार्च 2021 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 8 मार्च 2021 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणार्‍या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती श्री. मदान यांनी दिली.

- 15 जानेवारी 2021 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य

- 15 फेब्रुवारला प्रारूप मतदार यादी प्रसिध्द

- 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत हरकतींसाठी मुदत

- 1 मार्च ला अंतिम मतदार याद्या

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com