शिर्डी, अकोले, कर्जत, पारनेर नगरपंचायतींची निवडणूक जाहीर

21 डिसेंबरला मतदान || नगरपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू
शिर्डी, अकोले, कर्जत, पारनेर नगरपंचायतींची निवडणूक जाहीर

मुंबई, अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विविध 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल. यात नगर जिल्ह्यातील शिर्डी, अकोले, कर्जत आणि पारनेर नगरपंचायतींचा समावेश आहे. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे.

एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत संपलेल्या 81 आणि डिसेंबर 2021 मध्ये मुदत संपणार्‍या 18; तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतींच्या प्रत्येकी 17 सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होईल. त्यासाठी 1 ते 7 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. 4 व 5 डिसेंबर 2021 रोजी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 8 डिसेंबर 2021 रोजी होईल. मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल असे मदान यांनी सांगितले.

राखीव जागेवर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर कोविड-19 संदर्भात केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार व आवश्यक त्या उपाययोजना करून या निवडणुकांचा कार्यक्रम राबवावा. त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2020 रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, असेही निर्देश संबंधित जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले असल्याचे मदान म्हणाले.

दरम्यान, नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक पक्षांच्या नेत्यांनी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम -

- उमेदवारी दाखल : 1 ते 7 डिसेंबर

- सुट्टी : 4 व 5 डिसेंबर

- छाननी : 8 डिसेंबर

- मतदान : 21 डिसेंबर

- मतमोजणी : 22 डिसेंबर,स. 10 वाजल्यापासून

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com