नागरदेवळे नगरपरिषदेच्या घनकचरा डेपोसाठी 12 एकर जागेची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

नागरदेवळे नगरपरिषदेच्या घनकचरा डेपोसाठी 12 एकर जागेची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

महाविकास आघाडी शासन असताना नगर (Nagar) शहरालगत असलेल्या नागरदेवळे (Nagardevale) या तीन गावांची मिळून नगरपरिषद (Municipal Council) निर्माण केली ती केवळ ही गावे नगरपरिषद (Municipal Council) करण्याच्या निकषात बसत असल्याने व त्या गावातील उडालेल्या नागरी सुविधांच्या (Civil Facilities) बोजवारा लक्षात घेऊनच ही निर्मिती करण्यात आली. त्या अनुषंगाने या तीन गावांची कचर्‍याची समस्या निवारण (Solving the Waste Problem) होण्यासाठी घनकचरा डेपोसाठी (Solid Waste Depot) नवीन शासकीय मालकीची बारा एकर जागेची मागणी संबंधित मुख्याधिकार्‍यांकडून जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री व या भागाचे लोकप्रतिनिधी आ. प्राजक्त तनपुरे (MLA Prajakt Tanpure) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नगर तालुक्यातील (Nagar Taluka) नागरदेवळेसह (Nagardevale) तीन गावांची होणारी नवीन नगरपालिका पुढील कामकाजाबाबत पत्रकारांना त्यांनी विस्तृत माहिती दिली. या गावातील कचर्‍याची समस्या मोठी होती व यातून वाढत्या शहरीकरणामुळे कचरा (Garbage) वाढत जाऊन त्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही व्यवस्था या ठिकाणी नव्हती.किंबहुना बरेच नागरिक कचरा (Garbage) जाळून टाकताना दिसत होते. ग्रामपंचायत असताना नागरी सुविधांसाठी निधीची कमतरता येत होती. पाणीपुरवठ्याबाबतही पंधरा दिवसातून ग्रामीण पाणी योजनेतून एकदाच पाणी मिळत असल्याच्या तक्रारी येथील नागरिकांच्या होत्या.

या भागातील बहुतांश नागरिक अकृषक अवलंबित्वावर असल्याने नगरपरिषद निर्मितीसाठी निकष पात्र गावे होती. महाविकास आघाडी शासन असताना नगरपरिषदेची निर्मिती करून प्रस्ताविक कामांबाबत पाठपुरावा सुरू होता. परंतु शासन बदलल्याने थोडी अडचण निर्माण झाली आहे. नवीन शासनाकडून अजूनही संबंधित मंत्र्यांची नेमणूक न झाल्याने मागणी करण्याबाबत अडचणी येत आहेत. बदल्यांना स्थगिती असताना कर्जतच्या मुख्याधिकार्‍यांकडे या नगर परिषदेचा प्रभारी कारभार सोपविला होता. नवीन शासन निर्मिती प्रक्रियेतून मंत्रिमंडळ विस्तारानंतर या नगर परिषदेसाठी नवीन स्वतंत्र मुख्याधिकारी मिळेल, नगरपरिषदेचे कामकाजाबाबत माहिती व प्रशिक्षण घेण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना राहुरी नगर परिषदेत प्रशिक्षणही देण्यात आले.

ग्रामपंचायत पातळीवर मानसी 55 लिटर पाणी मिळण्याचे प्रमाण नगरपरिषदेनंतर 135 लिटर प्रति मानसी होणार आहे. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पंधरा दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असल्याने शासनाच्या राज्य नगरोत्थान मधून पाणी योजनेसाठी निधी मिळतो. त्यानुसार नवीन योजनेसाठी कन्सल्टंट नेमणूक करून डीपीआर करण्यासाठी मुख्याधिकार्‍यांना सूचना केल्या आहेत. या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन माध्यमातून नगरपरिषदेला घंटागाड्या व इतर सुविधा देऊन कचरा मुक्ती व पाणीपुरवठा या दोन्ही मूलभूत समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. येणार्‍या अडीच वर्षात आपल्या मतदारसंघातील नगरपरिषद म्हणून या सर्व योजना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याचा मनोदय आ. तनपुरे यांनी यावेळी व्यक्त केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com