नागरदेवळे नगर परिषदेला 5 कोटींच्या निधीचा बार फुसकाच

शिवाजी कर्डिले || प्रत्यक्षात कोणताही निधी प्राप्त नाही
नागरदेवळे नगर परिषदेला 5 कोटींच्या निधीचा बार फुसकाच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुक्यातील नागरदेवळे वडारवाडी व बाराबाभळी ग्रामपंचायत बरखास्त करून नगर परिषद स्थापनेचा घाट घालत मोठ्या थाटात 5 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. परंतु नगर पंचायतची घोषणा होऊन तीन महिने उलटले तरीही अद्याप नगर पंचायत खात्यावर एक रुपयाचा निधी वर्ग झालेला नाही. यामुळे निधीचा बार फुसका असल्याची टीका आ. शिवाजी कर्डिले यांनी केली आहे.

आ. प्राजक्त तनपुरे यांनी स्वतःच्या राजकारणासाठी नागरदेवळे, बाराबाभळी व वडारवाडी ग्रामस्थांना वेठीस धरले आहे. निधी उपलब्ध नसल्यामुळे विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. प्रत्यक्षात एकही जबाबदार अधिकारी नियुक्तीवर नव्हता. परंतु माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून नागरिकांच्या दैनंदिन अडचणी प्रशासकीय समस्यासाठी येत असलेल्या अडचणींबाबत गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंती केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी विविध अधिकार्‍यांची प्रतिनियुक्ती केली.

आ. तनपुरे व त्यांचे उत्साही कार्यकर्ते पदाधिकारी मात्र फक्त नगरपंचायत स्थापनेचा ढोल वाजवत मोठ्या विकास कामांची स्वप्ने दाखवण्यातच मशगुल राहिले व जनतेला वार्‍यावर सोडले कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध नसल्यामुळे नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळी गावातील विकासाचे प्रश्न प्रलंबित राहिलेत असा आरोप कर्डिले यांनी केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com