नागरदेवळे येथे होणार नगरपरिषद

वडारवाडी, बाराबाभळीचा समावेश: प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध
नागरदेवळे येथे होणार नगरपरिषद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहराजवळील नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळी या तीन ग्रामपंचायतींची मिळून नागरदेवळे नगरपरिषद अस्तित्वात येणार असून याबाबतची प्रारूप अधिसूचना राज्याचे नगरविकास विभागाने प्रसिद्ध केली आहे. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघातील ही गावे असून या गावांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र त्या तुलनेत नागरिकांना मुलभूत सोयीसुविधा मिळत नसल्याने तीन ग्रामपंचायतींची मिळून नगरपरिषद अस्तित्वात आल्यास येथील नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध होतील.

राज्याच्या नगरविकास विभागाने नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळी या ग्रामपंचायतींचे स्थानिक क्षेत्र हे लहान नागरिक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यासाठी आणि या क्षेत्रासाठी नागरदेवळे नगर परिषद या नावाने नगरपरिषद गठीत करण्याच्यादृष्टीने प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसुचनेवर 30 दिवसांच्या आत हरकती मागविण्यात आल्या असून हरकतदारांनी त्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करावयाच्या आहेत. 30 नोव्हेंबर नंतर प्राप्त होणार्‍या हरकतींचा कुठलाही विचार शासनाकडून केला जाणार नाही. विहित मुदतीत आलेल्या हरकतींबाबत शासनाकडून विचार केला जाणार आहे, असेही या अधिसूचनेत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com