दिवसा घरफोडून सात तोळ्याचे दागिने लांबविले

85 हजाराची रक्कम लंपास || नागरदेवळेची घटना
दिवसा घरफोडून सात तोळ्याचे दागिने लांबविले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नागरदेवळे (ता. नगर) येथील राधानगरीमध्ये असलेले एका खासगी नोकरदाराचे घर चोरट्यांनी दिवसा फोडले (Burglary). शनिवारी (3 जून) सकाळी साडे नऊ ते दुपारी तीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. सुमारे सात तोळ्याचे सोन्याचे दागिने (Gold Ornaments), 85 हजार रूपये रोख रक्कम असा दोन लाख 25 हजार 900 रूपयांचा ऐवज चोरीला (Theft) गेला आहे.

दिवसा घरफोडून सात तोळ्याचे दागिने लांबविले
दोन वाहनांच्या अपघातात युवक जागीच ठार

या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) घरफोडीचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. संजय शेषमल मुनोत (वय 53 रा. राधानगरी, नागरदेवळे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी त्यांचे घर शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता कुलूप लावून बंद केले होते. चोरट्यांनी कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरात ठेवलेले दीड तोळ्याचे मनीमंगळसूत्र, पाच ग्रॅमची अंगठी, चार तोळ्याच्या बागड्या, पाच ग्रॅमची नथ, नऊ चांदीचे सिक्के व 85 हजार रूपये रोख रक्कम असा दोन लाख 25 हजार 900 रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. दुपारी तीन वाजता घरफोडीचा (Burglary) प्रकार लक्ष्यात आला. त्यानंतर भिंगार कॅम्प पोलिसांना माहिती देण्यात आली.

दिवसा घरफोडून सात तोळ्याचे दागिने लांबविले
तलाठी पदासाठी मेगाभरती?

पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अनिल कातकाडे, सहायक निरीक्षक दिनकर मुंढे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी करीत आहेत.

दिवसा घरफोडून सात तोळ्याचे दागिने लांबविले
पुणे, नागपूरनंतर नगरच्या 16 मंदिरात ड्रेसकोड
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com