प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी जळगावचे पाटील

प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी जळगावचे पाटील

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या दहा ते अकरा महिन्यांपासून रिक्त असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी (Primary Education Officer of Zilla Parishad) पदावर शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. या जागेवर जळगाव जिल्ह्यातून (Jalgav District) माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील (Education Officer of Secondary Education Department B. J. Patil) यांच्या बदलीचे आदेश सोमवारी झाले आहेत. लवकरच ते पदभार घेतील.

नगर जिल्हा परिषद (Nagar Zilla Parishad) प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे (Primary Education Department Education Officer Ramakant Kathmore) यांची औरंगाबादला (Aurangabad) पदोन्नतीने उपसंचालक पदावर बदली झाल्यापासून हे पद रिक्त होते. सध्या या पदावर माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे (Secondary Department Deputy Education Officer Shivaji Shinde) हे प्रभारी म्हणून कामकाज पाहत होते.

नगर (Nagar) जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक (Primary and secondary) असे दोन्ही पदे हे अनेक महिन्यांनापासून रिक्त आहेत. दोन्ही ठिकाणी माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी प्रभारी कामकाज पाहत आहेत. नूतन शिक्षणाधिकारी दोन दिवसांत पदभार घेण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com