नगरच्या तरूणाने दाखवला प्रामाणिकपणा; पोलिसांंनी केले कौतुक

नगरच्या तरूणाने दाखवला प्रामाणिकपणा; पोलिसांंनी केले कौतुक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सोन्यांचे दागिणे व रोख रक्कम असा दोन लाख पाच हजार रूपयांचा मुद्देमाल असलेली पर्स एकाला तारकपूर परिसरात सापडली. त्याने प्रामाणिकपणा दाखवत ती तोफखाना पोलीस ठाण्यात जमा केली. ही पर्स ज्या महिलेची होती तिला पोलिसांनी ती परत केली.

जिल्हा रूग्णालयात काम करणार्‍या सुनिता किसन व्हटकर (रा. गुलमोहर रोड, नगर) या 30 एप्रिल रोजी तारकपूर येथून जात असताना त्यांची पर्स हरवली होती. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी वस्तू मिसींगची नोंद केली होती.

दरम्यान, त्याच दिवशी हरवलेली पर्स राजकुमार नारंग (रा. लालटाकी, नगर) यांना सापडली. नारंग यांनी प्रमाणिकपणा दाखवत सदरची पर्स पोलिसांकडे दिली. पोलिसांनी ती पर्स सुनिता व्हटकर यांना देऊन टाकली. नारंग यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, सहायक निरीक्षक किरण सुरसे यांनी त्यांचा सत्कार केला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com