<p><strong>अहमदनगर|Ahmedagar</strong></p><p>डिझेलची बेकायदेशीररीत्या वाहतूक करणार्या ट्रक व टँकरला पोलिसांनी पकडले. यामध्ये 1 हजार 937 लीटर डिझेड मिळून आले. </p>.<p>पोलिसांनी ट्रक, टँकर व डिझेल असा 13 लाख 45 हजार 275 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी गौतम वसंत बेळगे (रा. भगवान बाबा चौक, भिंगार) याच्याविरूद्ध भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकाने नगर शहरात ही कारवाई केली.</p>