नगरमधील लसीकरण केंद्रावर गर्दी

नगरमधील लसीकरण केंद्रावर गर्दी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका असल्याने नागरिकांनी लस घेण्यास प्राधान्य दिले आहे. यामुळे नगरच्या सर्वच लसीकरण केंद्रावर सध्या नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. त्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. महापालिकेचे लसीकरणाबाबत कोणतेही नियोजन नसल्याने विनाकारण गर्दी होत असल्याचे चित्र नगरमध्ये दिसत आहे.

सोमवारी मनपाच्या तोफखाना केंद्रावर पहाटे सहापासून लोक लस घेण्यासाठी उभे होते. सकाळी 9 वाजता लसीकरणाची वेळ जाहीर केलेली असली, तरी सव्वादहा पर्यंत लसीकरण सुरू झालेले नव्हते. गर्दीत वृद्धांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. तेथे बसण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांना अक्षरश: खाली बसावे लागले होते. या गर्दीत अनेक लोकांनी मास्कही लावलेले नव्हते.

लोक एकमेकांना चिकटून उभे असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. तेथे शिस्त लावण्यासाठी महापालिकेतर्फे कोणीही नव्हते. लसीकरण केंद्राचे दार बंद होते. दाराजवळ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, की तेथे पाय ठेवण्यासही जागा नव्हती. हीच स्थिती बहुतेक मनपाच्या सर्वच ठिकाणी होती. लस घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आलेले लोकही बर्याचवेळ ताटकळत उभे होते.

सोमवारी 10 वाजेपर्यंत पहिला डोस देणार की, दुसरा याची माहिती मनपाने जाहीर केलेली नसल्याने नागरिक हवालदिल झाले होते. आज डोस कुठला देणार, हे महापालिकेच्या यंत्रणेने सकाळीच जाहीर केले, तर फक्त संबंधित लोकच तेथे थांबतील, असे उपस्थित नागरिकांचे म्हणणे होते. त्यामुळे महापालिकेने दररोज सकाळी तसे जाहीर करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. महापालिकेच्या केंद्रावरील कर्मचार्यांनाही आज किती डोस येणार, त्यात पहिला असेल की दुसरा, याची माहिती ऐनवेळी समजते. त्यामुळे हा गोंधळ होत असल्याचे महापालिकेच्या कर्मचार्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com