नगर अर्बन बँकेसाठी 28 नोव्हेंबरला मतदान

56 हजार मतदार: 1 डिसेंबरला निकाल
नगर अर्बन बँकेसाठी 28 नोव्हेंबरला मतदान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

व्यापारी क्षेत्रातील महत्त्वाची मानली जाणारी नगर अर्बन मल्टिस्टेट शेड्यूल्ड बँकेच्या निवडणुकीचा (Nagar Urban Multistate Scheduled Bank Election) बिगुल वाजला असून, संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी 28 नोव्हेंबरला मतदान (Voting) होणार आहे, तर 30 नोव्हेंबर रोजी मतमोजणी (Counting of votes) होणार आहे. तब्बल दोन वर्षांनी ही निवडणूक (Election) होत आहे.

जिल्हा उपनिबंधक (District Deputy Registrar) तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर (Returning Officer Digvijay Aher) यांनी प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. निवडणुकीचा अधिकृत निकाल 1 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार आहे. बँकेच्या 18 जागा असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृतीसाठी 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. 3 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.

वैध उमेदवारी अर्जांची यादी 8 नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार असून, 15 नोव्हेंबरला उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून, 55 हजार 991 मतदारांचा यात समावेश आहे. 1 हजाराचे शेअर्स असणार्‍यांना मतदानाचा अधिकार आहे. 2014 साली 48 हजार 677 मतदार होते. त्यात यंदा 7 हजार 314 मतदार वाढले आहेत. राज्याबाहेर अहमदाबाद व सूरतमध्ये 398 सभासद आहेत.

दरम्यान, गैरव्यवहारामुळे नगर अर्बन बँक गेल्या काही वर्षांपासून चर्चेचा विषय राहिली आहे. बँकेतील गैरव्यवहाराबाबत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. बँकेचा एनपीए वाढल्यामुळे रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. बँकेच्या संचालक मंडळाची यापूर्वी 2014 मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीत माजी खासदार दिवंगत दिलीप गांधी यांच्या पॅनलने बँकेवर एकहाती सत्ता मिळविली होती.

18 जागा

मनपा व भिंगार छावणी मंडळ मतदारसंघ (12 जागा) - त्यात 1 महिला राखीव, 1 अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती राखीव, महाराष्ट्र राज्य मतदारसंघ (5 जागा) - त्यात 1 महिला राखीव, महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्राबाहेरील मतदारसंघ (1 जागा).

Related Stories

No stories found.