‘त्या’ तीन डॉक्टरांचा जामीन फेटाळला

नगर अर्बनच्या फसणूक प्रकरण : पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू
‘त्या’ तीन डॉक्टरांचा जामीन फेटाळला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेच्या (Nagar Arban Bank) पिंपरी-चिंचवड शाखेतील (Pimpri-Chinchwad Branch) 22 कोटी रुपयांचा आर्थिक फसवणूक प्रकरणातील (cases of financial fraud) पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केलेल्या नगरच्या तीन डॉक्टर (Doctor) यांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले (Bail application rejected by court) असल्याची माहिती पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे तपासी अधिकारी वसंत बाबर यांनी दिली. या आरोपीमध्ये डॉ. भास्कर सिनारे, डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. रवींद्र कवडे यांचा समावेश आहे.

बँकेच्या पिंपरी चिंचवड येथील शाखेतील फसवणूक प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (Department of Financial Crimes Investigation) आत्तापर्यंत आठ जणांना अटक (Arrested) केलेली आहे. यात नगरच्या तीन डॉक्टरांचा समावेश आहे. या प्रकरणातील आरोपी असलेल्या आशुतोष लांडगे (Ashutosh Landage) याच्या खात्यामध्ये अकरा कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले होते. त्यातील सहा कोटी चार लाख रुपये ही रक्कम या तीन डॉक्टरांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी या तीन डॉक्टरांना नगर येथून अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत 30 जून रोजी संपल्यानंतर त्या तीनही डॉक्टर आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली होती.

न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर या तीनही आरोपींनी न्यायालयामध्ये वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता. या जामीन अर्ज संदर्भामध्ये आक्षेप घेताना पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयासमोर युक्तिवाद केला यात हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून 22 कोटी रुपयांचा अपहार झालेला आहे. ही रक्कम कोणाकोणाला कशा स्वरूपामध्ये दिलेली आहे, हे तपासामध्ये उघड झालेले आहे. त्यामुळे या रकमेच्या संदर्भात अन्य आरोपींचा सुद्धा आम्ही शोध घेत आहोत. या घटनेचा तपास अजून पूर्ण व्हायचा आहे, त्यामुळे यांना जामीन देऊ नये, असे लेखी म्हणणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने न्यायालयामध्ये सादर करण्यात आले. त्यानंतर या तीनही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून (Rejecting the bail application of all the three accused) लावला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com