नगर अर्बनच्या ठेवीदारांना मिळणार 178 कोटी

अन्य बँकांतील खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात, 9 हजारावर जणांना लाभ
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

चुकीचे कर्ज वाटप (Loan), वाढता एनपीए (NCP), रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) घातलेले निर्बंध (Restrictions) व अनुषंगीक बाबींनी नेहमी चर्चेत असलेल्या येथील नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या (Nagar Urban Multistate Scheduled Bank) ठेवीदारांना शनिवारचा (5 मार्च) दिवस आनंदाचा ठरला. 5 लाखांच्या आत ठेवी असलेल्या 9 हजार 462 ठेवीदारांच्या अन्य बँक खात्यात (Bank Accident) सुमारे 178 कोटीची रक्कम डिपॉझीटगॅरंटी कॉपोरेशनने वर्ग केली आहे. दरम्यान, नव्याने सात हजारावरजणांचेठेवी परत मिळण्याबाबतचे अर्ज आले असून, त्यांनाही येत्या दीड महिन्यांत त्यांची रक्कम मिळणार आहे.

थकबाकी वसुली होत नसल्याने व एनपीए कर्ज खाती वाढल्यो बँकेवर नवे संचालक मंडळ डिसेंबर 2021 मध्ये सत्तारुढ झाले असले तरी रिझर्व्ह बँकेने कामकाजावर निर्बंध लावले आहेत. खातेदार-ठेवीदारांना सहा महिन्यांतून एकदाच व फक्त 10 हजार रुपये काढण्याची मुभा होती. यामुळे ठेवीदारांचे धाबे दणाणले होते. मात्र, बँकेच्या ठेवींना विमा संरक्षण असल्यानेडिपॉझीट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनने (डीआयसीजीसी) 5 लाखांपर्यंत ठेवी असलेल्यांच्या रकमा परत देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी मागील जानेवारीपासून क्लेम दाखल करून घेतले गेले होते. यानुसार बँकेकडे 181 कोटी 71 लाखाची रक्कम आली असून यापैकी 9 हजार 462 जणांच्या अन्य बँकांतील खात्यात 178 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती बँकप्रशासनाद्वारे देण्यात आली.

दरम्यान, बँकेकडे पुढील क्लेम लिस्टसाठी 7 हजारावर फॉर्म जमा झालेले आहेत. या क्लेम फॉर्मची रक्कम येणार्‍या 45 दिवसामध्ये खातेदारांना मिळणार आहे. ज्या खातेदारांनी अद्यापही क्लेम फॉर्म भरले नाहीत अशांनीत्वरित खाते असलेल्या बँकेच्या शाखेत जाऊन फॉर्म भरावा, असे आवाहन अर्बन बँकेचे अध्यक्षराजेंद्र अग्रवाल व उपाध्यक्ष दीप्ती गांधी यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com