पुढील महिन्यात नगर अर्बन बँकेचा बिगूल

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधकांची नियुक्ती
पुढील महिन्यात नगर अर्बन बँकेचा बिगूल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्याच्या अर्थकारणात महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या व शतकोत्तरी वाटचाल करणार्‍या परंतु सध्या प्रशासकाच्या नियंत्रणात असलेल्या नगर अर्बन सहकारी बँकेची निवडणूक (Election of Nagar Urban Co-operative Bank) घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर (District Deputy Registrar Digvijay Aher) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आहेर यांनी बँकेला मतदार यादी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पुढील महिन्यांत अर्बन बँकेचा (Urban Co-operative Bank) घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंध बिगूल वाजणार आहे.

अर्बन बँक मल्टीस्टेट बँक (Urban Bank Multistate Bank) आहे. त्यामुळे केंद्रीय सहकार विभागाचे त्यावर नियंत्रण (Control of Central Co-operative Department) आहे. केंद्रीय निबंधकांनी व भारतीय रिझर्व बँकेनेही (Reserve Bank of India)अर्बन बँकेची निवडणूक (Election of Urban Bank) घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्याबाबतचे पत्रही राज्याच्या सहकार आयुक्तांना 16 सप्टेंबरला पाठविले होते. सहकार आयुक्तांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक आहेर यांची नियुक्ती केली आहे. राज्य सरकारने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर करोना संसर्गामुळे निर्बंध आणले होते. आता निर्बंध हटवून निवडणुकांचा मार्ग मोकळा केला आहे.

दरम्यान, मोठ्या थकबाकीमुळे रिझर्व बँकेने 1 ऑगस्ट 2019 रोजी अर्बन बँकेच्या संचालक मंडळाचे अधिकार गोठवून, बँकेवर प्रशासकाची नियुक्ती केली. सुरुवातीला रिझर्व बँकेचे निवृत्त व्यवस्थापक सुभाषचंद्र मिस्त्रा यांची वर्षभरासाठी त्यानंतर सध्या महेंद्रकुमार रेखी प्रशासक आहेत. प्रशासकाच्या ताब्यात जाऊनही बँकेचे थकित कर्ज फारसे वसुल झालेले नाही. बँकेचे थकीत कर्ज वसूल होऊन बँक सुस्थितीत यावी तसेच बँकेची फसवणूक करणार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, यासाठी बँक बचाव कृती समितीचे प्रमुख तथा माजी संचालक राजेंद्र गांधी तसेच मनोज गुंदेचा, पोपट लोढा आदींचे प्रयत्न सुरू आहेत.

दोनच दिवसापूर्वी गांधी (Gandhi) व गुंदेचा (Gundecha) यांना वसुलीतील उपाययोजनांसाठी, पाठपुरावा करण्यासाठी रिझर्व बँकेचे सहप्रबंधक संजीवकुमार यांनी मुंबईत चर्चेसाठी निमंत्रित केले होते. बँकेचे सुमारे 1 लाख 15 हजार सभासद आहेत. परंतु बँक मल्टीस्टेट करण्याचा निर्णय झाल्यानंतर 1 हजार रुपये शुल्क जमा करणार्‍या सभासदालाच मतदानाचा अधिकार प्राप्त राहील, असा ठराव करण्यात आला. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत 48 हजार सभासद मतदार होते. त्यानंतर ही संख्या 55 हजारापर्यंत गेल्याचा अंदाज बँकेच्या वर्तुळात व्यक्त केला जातो.

बँकेच्या प्रशासनाकडे सभासदांच्या नावांची मराठी आणि इंग्रजी भाषेतील यादी मागविण्यात आली आहे. याबाबत बँकेला पत्र देण्यात आले असून आठ दिवसांत यादी आल्यानंतर मतदार यादी प्रसिध्द करून त्यावर हरकती घेण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक आहेर यांनी सांगितले. यामुळे येत्या महिनाभरात निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com