अर्बन बँकेत राजीनामा सत्र सुरूच!

संचालक भैय्या गंधे यांच्याकडून पदाचा त्याग
अर्बन बँक
अर्बन बँक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या काही महिन्यांपासून दररोज नवनव्या कारणांमुळे गाजत असलेल्या नगर बँकेचे संचालक तथा भाजपचे शहराध्यक्ष भैय्या तथा महेंद्र गंधे यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा प्रभारी अध्यक्षा दीप्ती गांधी यांच्याकडे दिला आहे. संचालक पदाचा राजीनामा देणारे गंधे हे आता तिसरे संचालक ठरले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून आरबीआयचे निर्बंध, खोटी कर्ज प्रकरणे, बनावट सोने तारण यासह अन्य कारणांमुळे अर्बन बँक नगरसह राज्यात गाजत आहे. दररोज नवनवीन माहिती बँके घोटाळे, माध्यमे, सोशल मीडियातून समोर येत आहे. बँकेचे विद्यमान संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर लगेच काही दिवसांत बँकेवर आरबीआयने निर्बंध लादले. त्यानंतर मोठा गदारोळ झाल्या.

दरम्यान, माजी संचालक दिपक गांधी यांच्या पत्नी तथा संचालक संगिता गांधी यांनी आजारपणाचे कारण पुढे करत राजीनामा दिला. त्यानंतर संचालक आणि बँकेचे चेअरमन यांच्यात जाहिर वाद झाल्यानंतर चेअरमन राजेंद्र अग्रवाल यांनी देखील राजीनामा दिला. आता संचालक गंधी यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला प्रभारी चेअरमन दीप्ती गांधी यांच्याकडे दिला आहे. याबाबत संचालक गंधे यांच्याशी संपर्क केला असता, भाजपकडून मोठी जबाबदारी यांच्यावर सोपविण्यात येणार आहे, यामुळे बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा देत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com