नगर अर्बन बँकेला आरबीआयचा दिलासा

कॅश क्रेडिट, नजरगहाण कर्ज नूतनीकरणास परवानगी
नगर अर्बन बँक
नगर अर्बन बँक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नगर अर्बन को.ऑप.मल्टीस्टेट बँकेला (Nagar Urban Bank) मोठा दिलासा देत कॅश क्रेडीट कर्ज (Cash Credit Loans), नजरगहाण कर्ज (Loan) व लघुउद्योग धंद्यांना दिलेले नजरगहाण कर्ज कर्जखात्यांचे व्याज (Interest on Loan Accounts) भरून घेऊन नूतनीकरण करून घेण्यास परवानगी दिली आहे. 7 डिसेंबर 2021 पासून रिझर्व्ह बँकेने अर्बन बँकेवर (Nagar Urban Bank) आर्थिक निर्बंध लागू केले होते. मधल्या काळात कर्ज थकबाकी वसुली चांगल्या प्रकारे झाल्याने रिझर्व्ह बँकेने हा दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन अशोक कटारिया व मुख्य कार्यकारी अधिकारी एम.पी.साळवे यांनी दिली.

नगर अर्बन बँक
भाजप-बाळासाहेबांची शिवसेनेच्या दोन युवा नेत्यांमध्ये वाद

बँकेचे अध्यक्ष अशोक कटारिया यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक निर्बंधामुळे कॅशक्रेडीट, नजरगहाण कर्जाचे नूतनीकरण करता येत नव्हते. आता याबाबतचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. बँकेची कर्ज वसुली व एकूणच कामकाजात सकारात्मकता दिसल्यानेच रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. डीआयजीसीने निर्बंधानंतर बँकेत (Bank) 5 लाखापर्यंत ठेवी असलेल्या खातेदारांना 295 कोटी रुपये अदा केले.

नगर अर्बन बँक
अहमदनगरच्या जिल्हाधिकारीपदी यांची नियुक्ती

कर्ज व व्याजाची येणे बाकी 799.44 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे तीन वर्षानंतर बँकेने 3.27 कोटी रुपये इन्कम टॅक्सही (Income Tax) भरला आहे. कर्ज नुतनीकरणास परवानगी मिळाल्याने कर्ज खातेदारांना फायदा होणार असून खराब सिबिल सुधारणा करण्यासाठी मदत होणार आहे. बँकेच्या (Bank) सर्व ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत.

नगर अर्बन बँक
14 बाजार समित्यांची 20 मार्चला सुधारित अंतिम मतदार यादी

बँकेच्या थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु असून ती अधिक गतिमान करण्याचे संचालक मंडळाचे धोरण आहे. त्यामुळे सदर कारवाई टाळण्यासाठी कर्जदारांनी बँकेला थकबाकी भरून सहकार्य करण्याचे आवाहन व्हाईस चेअरमन दिप्ती गांधी तसेच संचालक मंडळाने व बँक प्रशासनाने केले आहे.

नगर अर्बन बँक
महापालिका : विविध प्रकारचे कर व दर वाढीचे प्रस्ताव
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com