सोमवारी ‘अर्बन’च्या वैध उमेदवारांची यादी

निवडणूक : 18 जागांसाठी 94 उमेदवारी अर्ज
सोमवारी ‘अर्बन’च्या वैध उमेदवारांची यादी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील महत्वाची आर्थिक संस्था आणि शंभर वर्षाहून अधिक परंपरा असणार्‍या नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी पात्र उमदेवारांची यादी प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर 9 ते 12 नाव्हेंबरपर्यंत माघारीसाठी मुदत असून शुक्रवार (12) उमेदवारांची अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे.

दरम्यान, बँकेच्या निवडणुकीसाठी बँकेच्या दाखल केलेल्या नऊ उमेदवारी अर्जावर हरकती नोंदविण्यात आल्या असून, त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी सुनावणी घेतलेली आहे. बँकेच्या 18 जागांसाठी होत असलेल्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी एकूण 94 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणुकीतील वैध उमेदवारांची यादी 8 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.

12 नोव्हेंबरला अंतिम उमदेवारी जाहीर झाल्यानंतर 15 तारखेला चिन्हाचे वाटप झाल्यानंतर निवडणुकीची रणधुमाळी पेटणार आहे. सत्ताधारी दिवंगत दिलीप गांधी गटा विरोधात बँक बचाव कृती समिती टक्कर देणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com