अर्बन बँक फसवणूक: ‘त्या’ तीन डॉक्टरांचा जामीन नामंजूर

शहर बँक फसवणूकीच्या गुन्ह्यात वर्ग करणार
अर्बन बँक फसवणूक: ‘त्या’ तीन डॉक्टरांचा जामीन नामंजूर
नगर अर्बन बँक

अहमदनगर|Ahmedagar

नगर अर्बन बँकेच्या (Nagar Urban Bank) 22 कोटी 90 लाख रूपये कर्ज फसवणूक (Loan Fraud) प्रकरणी नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Financial Crimes Branch) अटक केलेले डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. भास्कर सिनारे व डॉ. रवींद्र कवडे यांचे जामीन अर्ज न्यायालयाने (Court) नामंजूर केले आहेत. दरम्यान शहर सहकारी बँकेतील कर्ज फसवणूक प्रकरणी (City co-operative bank loan fraud case) दाखल असलेल्या तीन गुन्ह्यापैकी एका गुन्ह्यात या तीन डॉक्टरांचा सहभाग आढळून आल्याने त्यांना या गुन्ह्यात वर्ग करून घेतले जाणार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी सांगितले.

नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेत घोटाळा (Nagar Urban Bank Pimpri Chinchwad branch Fraud) झाल्यानंतर याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात (Pimpri Chinchwad police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखा करत असताना या तीन डॉक्टरांच्या खात्यामध्ये सहा कोटी चार लाख रूपये वर्ग झाल्याचे समोर आले होते. यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांना नगरमधून अटक केली होती. यानंतर नगर अर्बन बँकेच्या (Nagar Urban Bank) नगर शाखेत झालेल्या कर्ज फसवणूक प्रकरणी या तीनही डॉक्टरांना (Doctor) वर्ग करून घेतले होते. त्यांना न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी त्यांच्या कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. याच दरम्यान तीनही डॉक्टरांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केले होते. त्यांचे जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केले आहे.

दरम्यान नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अर्बन बॅक फसवणूक व अहमदनगर शहर सहकारी बँक फसवणूक प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या गुन्ह्यात डॉ. निलेश शेळके यालाही अटक करण्यात आली आहे. शहर सहकारी बँकेतील 17 कोटी 25 लाख रूपयांच्या बोगस कर्ज फसवणूक प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात राहुरी येथील डॉ. रोहिणी भास्कर सिनारे, श्रीरामपूर येथील डॉ. उज्ज्वला रवींद्र कवडे, नगरमधील डॉ. विनोद आण्णासाहेब श्रीखंडे यांनी प्रत्येकी पाच कोटी 75 लाख रूपयांची फसवणूक झाल्याच्या स्वतंत्र फिर्यादी दिल्या आहेत.

या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. यातील डॉ. रोहिणी सिनारे यांनी दिलेल्या फिर्यादीमधील गुन्ह्यात या तीनही डॉक्टरांच्या खात्यामध्ये काही रक्कम वर्ग झाल्याचे तपासात समोर आले आहे. यामुळे या गुन्ह्यात त्यांना वर्ग करून घेतले जाणार आहे. तशी न्यायालयाने परवानगी दिली असल्याचे उपअधीक्षक सोनवणे यांनी सांगितले. येत्या एक दोन दिवसामध्ये त्यांना वर्ग करून न्यायालयात हजर केले जाणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com